अरे देवा! या रेस्टॉरन्टमध्ये मिळतो 'भाजलेला स्वादिष्ट पती', चुकूनही पत्नीला नेऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:52 IST2019-01-31T14:44:18+5:302019-01-31T14:52:09+5:30

देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करून या डिशबाबत सांगितलं. तेव्हापासून या डिशची चर्चा रंगली आहे.

Anand Mahindra tweeted a menu card that has delicious roasted husband and tweet goes viral | अरे देवा! या रेस्टॉरन्टमध्ये मिळतो 'भाजलेला स्वादिष्ट पती', चुकूनही पत्नीला नेऊ नका!

अरे देवा! या रेस्टॉरन्टमध्ये मिळतो 'भाजलेला स्वादिष्ट पती', चुकूनही पत्नीला नेऊ नका!

वेगवेगळ्या हॉटेल्समधील वेगवेगळ्या पदार्थांची नावे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. काही नावं इतकं विचित्र असतात की, त्याचा अर्थही लागत नाही. आता असंच एका पदार्थाचं नाव चर्चेत आलं आहे. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद मंहिद्रा यांनीही ट्विट करून या डिशबाबत सांगितलं. तेव्हापासून या डिशची चर्चा रंगली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये चीनमधील एका रेस्टॉरन्टचं मेन्यू कार्ड आहे. यात एका पदार्थाचं नाव Delicious roasted hudband म्हणजेच 'स्वादिष्ट भाजलेला पती' असं दिलं आहे. 


अर्थातच या पदार्थाच नाव वाचल्यावर जगभरातील पतींची भंबेरी उडाली असणार. स्वत: आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे की, ते पत्नीसोबत या रेस्टॉरन्टमध्ये जाण्याआधी दोनदा विचार करतील, कारण मला तिला कोणतीही क्रिएटीव्ह आयडिया द्यायची नाहीये. असो हे तर आनंद महिंद्रांनी गमतीत म्हटलं आहे. पण तुम्हीही मेन्यू कार्ड चांगल्याप्रकारे बघा.





आता हे मेन्यू कार्ड व्हायरल झालं असून यावर लोक वेगवेगळे जोक्स करत आहेत. पण आता प्रश्न असा पडतोय की, खरंच या डिशमध्ये काय सर्व्ह केलं जात असेल? डिशला असं का नाव दिलं असेल? पण अजूनतरी याचं उत्तर मिळालेलं नाहीये.

Web Title: Anand Mahindra tweeted a menu card that has delicious roasted husband and tweet goes viral