भीषण धडकेनंतर दोनदा उलटली कार; मालकानं थेट महिंद्राना मेसेज केला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 17:33 IST2021-09-21T17:32:25+5:302021-09-21T17:33:59+5:30

महिंद्रा कारच्या मालकानं पाठवलेला व्हिडीओ आनंद महिंद्रांकडून रिट्विट

anand mahindra tweet after car accident owner says this the businessman answers | भीषण धडकेनंतर दोनदा उलटली कार; मालकानं थेट महिंद्राना मेसेज केला अन् मग...

भीषण धडकेनंतर दोनदा उलटली कार; मालकानं थेट महिंद्राना मेसेज केला अन् मग...

उद्योगपती आनंद महिंद्राट्विटरवर कायम सक्रीय असतात. अनेकदा ते प्रेरणादायी फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कधीकधी महिंद्रा मजेशीर फोटो, व्हिडीओदेखील शेअर करतात. आता आनंद महिंद्रांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्या व्हिडीओ खाली एकानं कमेंट म्हणून व्हिडीओ ट्विट केला. तो व्हिडीओ महिंद्रानी रिट्विट केला आहे.

सोशल मीडियावर कायम सक्रीय असलेल्या आनंद महिंद्रा यांचं त्यांच्या ट्विटखालील कमेंट्सवरदेखील बारीक लक्ष असतं. त्यांच्या ट्विटखाली एका व्यक्तीनं अपघातग्रस्त महिंद्रा कारचा फोटो ट्विट केला. गाडीला भीषण अपघात झाला. पण माझ्या कुटुंबाला साधं खरचटलंदेखील नाही, असं कार मालकानं म्हटलं होतं. अबिन्स चिट्टीलाप्पिली असं या कार मालकाचं नाव आहे.

अबिन्स चिट्टीलाप्पिली यांनी महिंद्रांचे आभार मानले आहेत. 'या कारनं माझ्या कुटुंबाला वाचवलं. माझ्याकडे एक्सयूव्ही ५०० आहे. एक भीषण धडक आणि दोनदा उलटूनही मी आणि माझं कुटुंब सुरक्षित राहिलो. महिंद्रा आणि माझ्या कारचे आभार,' असं अबिन्स यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. अबिन्स यांनी पाठवलेला व्हिडीओ महिंद्रा यांनी रिट्विट केला आहे. 'असे मेसेज आम्हाला अधिक सुरक्षित जोमानं काम करण्याची प्रेरणा देतात. सुरक्षितपणे कार चालवा आणि उत्तम राहा,' असं महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: anand mahindra tweet after car accident owner says this the businessman answers