वृद्धाने 'Reel' स्टारला दांडक्याने बदडलं; रस्त्यात रिल बनवणं युवकाला महागात पडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 10:44 IST2025-03-06T10:43:52+5:302025-03-06T10:44:50+5:30
४१ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात युवकाला मारताना एक महिला त्याला वाचवतानाही दिसून येत आहे.

वृद्धाने 'Reel' स्टारला दांडक्याने बदडलं; रस्त्यात रिल बनवणं युवकाला महागात पडलं
सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, या मोबाईलमधून इन्स्टाग्रामवर तासनतास रिल्स बघितल्या जातात. बरेच जण या रिलच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेत. रिल बनवण्याच्या नादात काहींनी जीव गमावल्याचीही घटना घडली आहे. इन्स्टावर रिल बनवण्याचं जणू काहींना व्यसनच जडलं आहे. रिल बनवणं गुन्हा नाही परंतु बनवणाऱ्यांनी वेळ आणि जागा पाहून फोनचा कॅमेरा उघडला पाहिजे नाहीतर ते त्यांना महागातही पडू शकते. इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक वृद्ध व्यक्ती युवकाला दांडक्याने चोप देताना दिसतंय.
माहितीनुसार, रस्त्यावर हा युवक आक्षेपार्ह रिल बनवत होता, त्यातून एक वृद्ध व्यक्ती चांगलाच संतापले आणि त्यांनी युवकाला धडा शिकवण्याचं ठरवलं. जेव्हा वृद्धाने युवकाने दांडक्याने मारण्यास सुरुवात केली तेव्हा तो युवक तिथून पळताना व्हिडिओत दिसून येतो. व्हायरल व्हिडिओवर २ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. पोस्टच्या कमेंट्समध्येही युवकाला चोप देणाऱ्या वृद्धाच्या बाजूने युजर्स प्रतिक्रिया देत आहेत.
वृद्धाने युवकाला बेदम मारलं
या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती युवकाला मारताना दिसतात. हा युवक रस्त्यावर रिल बनवत होता. त्याला रिल बनवणं इतकं महागात पडलं की या वृद्धाने त्याच्या कारमधून उतरत काठी हातात घेतली आणि युवकाला मारायला सुरू केले. हा युवक रस्त्यावर आक्षेपार्ह रिल शूट करत होता असं सांगितले जाते. व्हायरल व्हिडिओ पाहून युजर्सही युवकावर तोंडसुख घेत आहेत. ४१ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात युवकाला मारताना एक महिला त्याला वाचवतानाही दिसून येत आहे.
बुजुर्ग नहीं समझते कि यह रील बना रहा है, उन्हें यही लगेगा कि लड़की छेड़ रहा है। अब देखिए अंकल ने गाड़ी से लाठी निकाल कर बना दिया ओरिजनल रील। pic.twitter.com/lalzJ4XisW
— Abhimanyu Singh Journalist (@Abhimanyu1305) March 5, 2025
एका युजर्सने हा व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, हा युवक Reel बनवत होता हे वृद्ध व्यक्तीला कळलं नाही, त्यांना वाटलं हा रस्त्यात मुलीची छेड काढतोय. त्यामुळे वृद्धाने त्यांच्या कारमधून काठी बाहेर काढली मग ओरिजनल रिल तयार झाली. आतापर्यंत हा व्हिडिओ १० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून त्याला ८ हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.