Amrita Fadnavis photo is going viral on social media over photo lete raho massage | ‘फोटो लेते रहो!’...अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत; ‘तो’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

‘फोटो लेते रहो!’...अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत; ‘तो’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीससोशल मीडियावर चर्चेत असतात. विशेषतः, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या एकदमच प्रकाशझोतात आल्या होत्या. कधी गाण्यांमुळे, तर कधी एखाद्या टिप्पणीमुळे - वक्तव्यामुळे त्यांची चर्चा होत असते. आता एका फोटोमुळे त्या ट्रोल झाल्या आहेत.

अमृता फडणवीस यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कम्युनिटी हेल्थ सर्व्हिस २०१९-२० अंतर्गत वर्कशॉपमध्ये अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला तसेच समाजोपयोगी आरोग्य उपक्रमाची गरज आणि परिणाम याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. या वेबिनारसंदर्भात अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट अपलोड केली. 

या पोस्टमध्ये अमृता फडणवीस कॉम्प्युटरसमोर खुर्चीवर बसलेल्या दिसतात. मात्र फोटोच्या एका कोपऱ्यात दिसणाऱ्या कागदावर हलकसा मजकूर हाताने लिहिलेला दिसत आहे. याच मजकुरावरुन सध्या अमृता फडणवीस नेटिझन्सचं लक्ष्य ठरल्यात. अमृता फडणवीस यांचा फोटो झूम करून पाहिला, तर एका कागदावर ‘फोटो लेते रहो’ अशी सूचना लिहिलेली दिसते. तीच चर्चेचा आणि चेष्टेचा विषय ठरलीय.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amrita Fadnavis photo is going viral on social media over photo lete raho massage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.