कोण आहे ही पाकिस्तानी 'पॉरी गर्ल' जिने सर्वांना लावलंय वेड? सोशल मीडियावर रातोरात बनली स्टार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:52 IST2021-02-15T15:51:40+5:302021-02-15T15:52:16+5:30
Social Viral : चार सेकंदाच्या व्हिडीओला २ लाख ७४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओवर तिच्या फोटोंवर अनेक मीम्सही तयार झाले आहेत.

कोण आहे ही पाकिस्तानी 'पॉरी गर्ल' जिने सर्वांना लावलंय वेड? सोशल मीडियावर रातोरात बनली स्टार...
Social Viral : ही मुलगी सोशल मीडियावर रातोरात स्टार बनली आहे. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती बोलत आहे की, 'ये हमारी कार है, ये हम है और ये हमारी पॉरी(पार्टी) शुरू हैं'. चार सेकंदाच्या व्हिडीओला २ लाख ७४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओवर तिच्या फोटोंवर अनेक मीम्सही तयार झाले आहेत.
ही मुलगी इतकी फेमस झाली आहे की, प्रसिद्ध संगीतकार यशराजनेही एक मॅशअप व्हिडीओ बनवला आहे. त्याने कॅप्शनला लिहिले आहे की, 'आज से मै पार्टी नहीं सिर्फ पॉरी करूंगा. क्योंकी पार्टी करण्यात ती मजा नाही जी पॉरी करण्यात आहे'.
या तरूणीचं नाव दनानीर मुबीन आहे. ती पाकिस्तानच्या पेशावरची राहणारी आहे. ती स्वत:ला एक कंटेन्ट क्रिएटर सांगते. आपल्या इन्स्टा पेजवरून ती मेकअप आणि फॅशनपासून ते मानसिक आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींबाबत आपली मते मांडते.
तिचा हा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक तिला इन्स्टावर अधिक जास्त फॉलो करू लागले आहेत. सध्या तिचे ४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.
ती गाणंही गाते आणि पेंटींगही काढते. तिच्या इन्स्टावर काही पेंटींग्सही आहेत. तिचं इन्स्टाग्राम पेज पाहून हे लक्षात येतं की, तिला फिरायला फार जास्त आवडतं. ती नेहमीच फिरत राहते.