हॉटेलमध्ये थांबत असाल तर टूथब्रश 'तिजोरीत' ठेवा, एअरहोस्टेसनं सांगितलं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:59 IST2025-04-02T15:45:02+5:302025-04-02T15:59:17+5:30
Hotel Safety Tips : वेळोवेळी हॉटेलसंबंधी अशा अनेक गोष्टी समोर येतात ज्या घाबरवणाऱ्या असतात. एका एअरहोस्टेसनं असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

हॉटेलमध्ये थांबत असाल तर टूथब्रश 'तिजोरीत' ठेवा, एअरहोस्टेसनं सांगितलं कारण...
Hotel Safety Tips : कुणीही कुठे एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला गेल्यावर साधारणपणे हॉटेलमध्ये थांबतात. हॉटेलमध्ये थांबणं सगळ्यांनाच आवडतं आणि हा एक वेगळा अनुभवही ठरतो. कारण हॉटेलमध्ये स्वच्छताही असते आणि खाण्या-पिण्याची सोयही असते. पण वेळोवेळी हॉटेलसंबंधी अशा अनेक गोष्टी समोर येतात ज्या घाबरवणाऱ्या असतात. एका एअरहोस्टेसनं असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
एअरहोस्टेसनं सांगितलं की हॉटेलमध्ये थांबायचं असेल तर आपला टूथब्रश रूममधील लॉकरमध्येच ठेवावा. याचं कारण वाचाल तर तुम्हीही पुढे हेच कराल. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, Barbiebac La Azafata नावाची अर्जेन्टीनाची एअरहोस्टेस सोशल मीडियावर प्रवासासंबंधी टिप्स देत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 7 लाख फॉलोअर आहेत. अलिकडेच तिनं एक हॉटेलसंबंधी टिप्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या तिनं तुमचा टूथब्रश नेहमी हॉटेल रूममधील तिजोरीमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
ब्रश तिजोरीत ठेवण्याचं कारण...
बार्बीबॅकही असंच करते. इतकंच नाही तर तिच्या सहकारी एअरहोस्टेस देखील असंच करतात. कारणही धक्कादायक आहे. अनेक हाऊसकिपिंग करणारे ग्राहकांवर किंवा आपल्या बॉसवर इतके रागावलेले असतात की, ते पाहुण्यांच्या वस्तुंसोबत छेडछाड करतात. ते पाहुण्यांचा ब्रश रूममधील घाण स्वच्छ करण्यासाठीही वापर करतात. अनेकदा तिनं अशा घटनांबाबत ऐकलं आहे.
बाथरूमची टेस्ट करण्याचा सल्ला
दुसरा सल्ला तिनं असा दिला की, बाथरूममध्ये गेल्यावर आधी सगळ्या गोष्टी निट चेक करा. कधी बाथरूममध्ये छुपे कॅमेरे असतात तर कधी दोन्हीकडून दिसणारे काच असतात. खिडक्या व्यवस्थित चेक करा. अनेक अशा घटना समोर आल्या आहेत ज्यात बाथरूममधील व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलेत. सेम बाब रूमबाबतही लागू पडते. रूममधील लाइट बंद करून कॅमेराची माहिती मिळवू शकता.