किकीनंतर या क्रिएटीव्ह चॅलेंजचा सोशल मीडियात धुमाकूळ, बघा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 17:30 IST2018-08-15T17:28:16+5:302018-08-15T17:30:21+5:30
जगभरात गाजलेल्या किकी चॅलेंजनंतर आता आणखी एक चॅलेंज सोशल मीडियात गाजत आहे.

किकीनंतर या क्रिएटीव्ह चॅलेंजचा सोशल मीडियात धुमाकूळ, बघा फोटो!
(Image Credit : Topyaps.com)
अलिकडे लोक सोशल मीडियावर खूप जास्त निर्भर झालेले बघायला मिळतात. आपल्या आयुष्यात आलेल्या चॅलेंजशी लढण्याची त्यांच्यात हिंमत नसली तरी सोशल मीडियात मिळणाऱ्या चॅलेंज प्रत्येकजण पूर्ण करत आहे. या व्हर्चुअल दुनियेत चॅलेंजची क्रेझ फारच बघायला मिळत आहे. जगभरात गाजलेल्या किकी चॅलेंजनंतर आता आणखी एक चॅलेंज सोशल मीडियात गाजत आहे.
हे चॅलेंज जरा विचित्र असलं तरी क्रिएटीव्ह आहे. या चॅलेंजचं नाव इन्स्टासेप्शन आहे. लोकांमध्ये या खास चॅलेंजबाबत उत्सुकता दिसून येत आहे. या चॅलेंजनुसार तुम्हाला चेहऱ्यावर मेकअप करुन इन्स्टा पोस्टचं डिझाइन करायचं असतं. म्हणजे आतापर्यंत जेही क्रिएटीव्ही तुम्ही इन्स्टाग्रामवर शेअर करत होते ती तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर करायची आहे.
त्यानंतर तुमचा हा क्रिएटीव्ह फोटो तुम्हाला हॅशटॅग इन्स्टासेप्शन वापरुन सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. हे चॅलेंज अनेकांनी पूर्ण केलं असून तसे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.
एबी रॉबर या नावाच्या एका मुलीने हे चॅलेंज स्विकारुन फोटो शेअर केले आहेत.
परदेशात हे चॅलेंज चांगलंच गाजत असलं तरी भारतात अजून हे चॅलेंज तितकं माहीत नाहीये. पण लवकरच ते लोकप्रिय होईल यात शंका नाही.
या चॅलेंजची सुरुवात @dom.skii या अकाऊंटवरुन करण्यात आली आहे. या मुलीने इन्स्टाग्राम पोस्टचा फॉर्मॅट चेहऱ्यावर तयार करुन फोटो शेअर केलाय.