सोशल मीडियात धुमाकूळ घालणाऱ्या 'बेबी पंच'ला अखेर आधार मिळाला; Video पाहून अनेकांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:16 IST2026-02-22T15:16:20+5:302026-02-22T15:16:57+5:30

माकडाच्या समुहात राहूनही एकटेपणाने ग्रासलेल्या या बेबी मंकीचं भविष्य आता बदलले आहे.

After enduring days of rejection Social viral Baby Monkey Punch finally experienced the comfort of love | सोशल मीडियात धुमाकूळ घालणाऱ्या 'बेबी पंच'ला अखेर आधार मिळाला; Video पाहून अनेकांचे डोळे पाणावले

सोशल मीडियात धुमाकूळ घालणाऱ्या 'बेबी पंच'ला अखेर आधार मिळाला; Video पाहून अनेकांचे डोळे पाणावले

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एका बेबी मंकीचा हा व्हिडिओ जगभरात ट्रेंडिंगमध्ये आहे. पंच कुन नावाच्या बेबी मंकीचा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे न कळत पाणावले आहेत. इन्स्टाग्राम उघडताच या पंचची कहाणी सर्वांचे लक्ष वेधून घेते. एक चिमुकला माकड, ज्याला जन्मताच त्याच्या आईने सोडून दिले. त्याला खेळण्यातील एका बाहुलीने आधार दिला. ज्याप्रकारे बेबी पंच या बाहुलीला मिठी मारून बसतो, ते पाहून अनेक जण भावूक झाल्याचं दिसून येते. बेबी पंचचे अनेक व्हिडिओ, रिल्स शेअर केले जात आहेत. संपूर्ण इंटरनेटवर बेबी पंचसाठी अनेकजण प्रार्थना करत होते. 

माकडाच्या समुहात राहूनही एकटेपणाने ग्रासलेल्या या बेबी मंकीचं भविष्य आता बदलले आहे. अलीकडेच समोर आलेल्या व्हिडिओत संपूर्ण कहाणी बदललेली दिसते. पंच आता हळूहळू त्याच्या समुहात रमू लागला आहे. एका व्हायरल फुटेजमध्ये एका वयस्क मादी माकडाने पंचला मिठीत घेतल्याचे दिसते. हा तोच पंच आहे जो इतके आठवडे केवळ एका सॉफ्ट टॉयला चिपकून राहत होता. आता त्याला खऱ्या अर्थाने मायेची ऊब आणि प्रेमाचा स्पर्श मिळाला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने म्हटलंय की, इतका त्रास सहन करून अखेर पहिल्यांदा पंचला खरी शांतता मिळाली असेल. वयस्क मादी माकडाने त्याला आपल्या जवळ ठेवले. दुसऱ्या व्हिडिओत माकड पंचला ग्रूमिंग करताना दिसते. 

पंच कुन या बेबी मंकीने अनेकांनी मने जिंकली आहेत. एकाने लिहिलं, एका बेबी मंकीला जवळ केल्याचं पाहून माझ्या डोळ्यात पाणी येतंय यावर विश्वास बसत नाही तर दुसऱ्याने त्याचा अनुभव सांगितला. कालपर्यंत पंचचा व्हिडिओ पाहून मन खूप व्याकुळ झाले होते. काही सुचत नव्हते पण आज त्याला पाहून हृदय भरून आले. जपानच्या इचिकावा शहरात प्राणी संग्रहालयात २६ जुलै २००५ रोजी पंच कुनचा जन्म झाला. जन्मताच आईने त्याला सोडून दिले. त्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी प्राणी संगहालयातील कर्मचाऱ्यांनी सांभाळली. 

या कर्मचाऱ्यांनी पंचला सॉफ्ट टॉय आणून दिले. ज्याला त्याने पकडले, मिठी मारली आणि त्याच्यासोबत आपला एकटेपणा दूर केला. या खेळण्यातील बाहुलीनेच पंचच्या आईची जागा घेतली आणि तीच त्याची सुरक्षा बनली. काही काळानंतर जेव्हा पंचला दुसऱ्या माकडांच्या समुहात पाठवले तेव्हा तिथले वातावरण भीतीदायक होते. पंच त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा परंतु काही माकडे त्याला हुसकावून लावायचे. घाबरलेला पंच पुन्हा टॉयकडे परतायचा. पंचचा या खेळण्यातील बाहुल्यासोबत खेळताना, त्याला मिठी मारताना आणि त्याच्यासोबत झोपतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी त्याला दत्तक घेण्याची इच्छा दाखवली. 

या कहाणीत काय शिकायला मिळाले?

पंच या बेबी मंकीची कहाणी केवळ एका माकडाची नाही तर मानवी आयुष्यात असणाऱ्या भावनांचे प्रतिबिंब त्यात दिसून येते. एकटेपणा, प्रेमाचा स्पर्श, मिठी मारणे ही फक्त माणसांची गरज नाही तर प्रत्येक जीवाला त्याची आवश्यकता असते. सुरक्षेची जाणीव हवी असते. कुणाची तरी साथ हवी असते. हे जग प्रेमाने जिंकता येते. जिथे प्रेम मिळते तिथे एकटेपणा कायमचा निघून जातो. 

Web Title : वायरल वीडियो के बाद परित्यक्त बंदर के बच्चे को मिला प्यार।

Web Summary : जन्म के बाद छोड़े गए बेबी पंच नामक बंदर को एक खिलौने में आराम मिला। एक वायरल वीडियो ने उसकी तन्हाई दिखाई, जिससे वैश्विक चिंता पैदा हुई। अब, पंच एक बंदर समूह में एकीकृत हो रहा है, आखिरकार एक वयस्क मादा से स्नेह और देखभाल का अनुभव कर रहा है।

Web Title : Abandoned baby monkey finds love after viral video melts hearts.

Web Summary : Baby Punch, a monkey abandoned at birth, found comfort in a toy. A viral video showed his loneliness, sparking global concern. Now, Punch is integrating into a monkey group, finally experiencing affection and care from an adult female.