कडक! एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी मिसेस मुख्यमंत्र्यांनी वाजवला ड्रम, Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:13 IST2022-07-05T17:12:05+5:302022-07-05T17:13:47+5:30
एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ते सोमवारी ठाण्यात परतले.

कडक! एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी मिसेस मुख्यमंत्र्यांनी वाजवला ड्रम, Video तुफान व्हायरल
एक कट्टर शिवसैनिक आणि लोकांमध्ये रमणारा नेता अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ते सोमवारी ठाण्यात परतले. यावेळी एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठाण्यात काल पावसाची रिपरिप सुरू असतानाही ठिकठिकाणी ढोल ताशे आणि फुलांच्या वर्षावात एकनाथ शिंदेंची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
तब्बल १५ दिवसांनी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्ती स्थळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंद नगर चेक नाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झाल्यानंतर आपल्या ५० समर्थक आमदारांसह ते थेट आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. दरम्यान, मिसेस मुख्यमंत्र्यांचाही म्हणजेच लता शिंदे यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी चक्क ड्रम वाजवत जल्लोष साजरा केला.
कडक! एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी मिसेस मुख्यमंत्र्यांनी वाजवला ड्रम#Eknath_Shinde#Maharashtrapic.twitter.com/T7Usy9vwWF
— Lokmat (@lokmat) July 5, 2022
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर काल एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जोरदार स्वागत झालं. ठाणेकर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.