रॅपिडोने आता प्रत्येक शहरात बाईक सेवा सुरू केली आहे. दिल्लीमध्येहगी सेवा सुरू आहे, एका तरुणीने रॅपिडो चालकाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा अनुभव वाचून अनेकांना धक्का बसला आहे. त्या तरुणीची राईड संपल्यानंतरही चालकाने मेसेज आणि कॉल सुरुच ठेवले होते.
या तरुणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर तिचा भयानक अनुभव शेअर केला. ड्रायव्हर तिची राइड संपल्यानंतरही तिला फोन करत होता आणि मेसेज करत होता. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण होतो. रेडिटवर 'अलोगोभी' या युजरनेमने पोस्ट करणाऱ्या पीडितेने सांगितले की, रॅपिडोवरून राईड बुक करताना ही घटना घडली. ड्रायव्हरने तिला योग्य ठिकाणी सोडले, पण पैसे भरताना तो वैयक्तिक प्रश्न विचारू लागला.
पेगाससनंतर पॅरागॉनचा धोका! आता निशाण्यावर कोण? WhatsApp'ने इशारा दिला
त्या महिलेने पोस्टमध्ये लिहिले की, "काल मी रॅपिडोवरून एक राईड बुक केली. ड्रायव्हरने मला योग्य ठिकाणी सोडले, पण पैसे भरताना मला वैयक्तिक प्रश्न विचारू लागला." सुरुवातीला, महिलेला संभाषणात कोणतीही अडचण आली नाही आणि त्यांच्यात सामान्य संभाषण झाले, पण पुढे त्याने"तू खूप तरुण आणि सुंदर आहेस, मग लग्न झाले आहे का?", असा प्रश्न ड्राइव्हरने केला. हा प्रश्न ऐकून ती तरुणी अस्वस्थ झाली, यावेळी ती तरुणी हसली आणि संभाषण संपवले.
पण, ड्रायव्हरने लगेचच अडवून म्हटले, "कृपया मला भैया म्हणू नको", असं म्हणाला आणि सोशल मीडियाचे खाते मागू लागला. परिस्थिती बिकट होत चालली आहे हे पाहून, त्या तरुणीने सोशल मीडिया वापरत नाही असे सांगितले. यावेळी ती तरुणी तिथून लगेच गेली, पण चालकाने पुन्हा फोन आणि मेसेज करणे थांबवले नाही.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्याच दिवशी रॅपिडो ड्रायव्हरने वारंवार फोन केले आणि व्हॉट्सअॅपवर मेसेजही पाठवले. याचा स्क्रीनशॉट शेअर करत तरुणीने लिहिले की, "आज या माणसाने मला डझनभर वेळा फोन केले आणि मेसेजही पाठवले, जणू काही माझ्या गोपनीयतेचे उल्लंघन करणे ही एक सामान्य गोष्ट आहे." हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच इंटरनेटवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.