अधिवेशनाचा पहिलाच दिवस अन् पूर्वसंध्येला महिला खासदाराचं बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 13:23 IST2022-07-18T13:23:45+5:302022-07-18T13:23:45+5:30

अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले फोटो.

actress nusrat jahan latest sizzling photoshoot viral on social media instagram parliament session 2022 | अधिवेशनाचा पहिलाच दिवस अन् पूर्वसंध्येला महिला खासदाराचं बोल्ड फोटोशूट

अधिवेशनाचा पहिलाच दिवस अन् पूर्वसंध्येला महिला खासदाराचं बोल्ड फोटोशूट

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या अनेक कारणांमुळे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. त्या सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह असतात. अनेकदा त्या आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच नुसरत जहां यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बोल्ड फोटोज शेअर केले आहे. सध्या त्यांच्या फोटोजना चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.

नुसरत जहां यांनी व्हाईट कलरचं ऑफ शोल्डर टॉप परिधान केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे. यासोबतच त्यांनी डेनिम शॉर्ट्सही परिधान केली आहे. त्यांनी आपल्या फोटोला ‘फ्रॉम अनदर पॉईंट ऑफ व्ह्यू’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत.



अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोवर फायर आयकन टाकत कमेंट केलं आहे. खासदार असण्यासोबतच नुसरत जहां या अभिनेत्रीदेखील आहेत. नुसरत जहां यांनी ‘खिलाडी’, ‘शोत्रु’, ‘खोका ४२०’, ‘जमाई’, ‘लव एक्स्प्रेस’ आणि ‘क्रिसक्रोस’ या सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

Web Title: actress nusrat jahan latest sizzling photoshoot viral on social media instagram parliament session 2022