Accident Viral Video: ...अन् स्कूटर चालक त्याला चिरडून झाला पसार, पाहा नेमकं काय झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:23 IST2022-02-10T16:51:04+5:302022-02-10T17:23:22+5:30
Accident Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Accident Viral Video: ...अन् स्कूटर चालक त्याला चिरडून झाला पसार, पाहा नेमकं काय झालं
दररोज सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दोन तरुण रस्त्यावर झोपून आंदोलन येणाऱ्या-जाणाऱ्यांचा रस्ता अडवत होते. तेवढ्यात तिथे एक स्कूटी चालक आला आणि त्याने रस्त्यावर झोपलेल्या तरुणाच्या अंगावर गाडी घातली. फक्त त्यांच्या अंगावरच गाडी घातली नाही, तर त्याला चिरडून तो पसार झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन तरुण कपडे काढून रस्त्यावर झोपलेली दिसत आहेत. तेवढ्यात दोन स्कूटरच चालक तिथे येतात. रस्त्यावर झोपलेले दोघे त्या दोघांचा रस्ता अडवतात. स्कूटर चालक काहीवेळ तिथेच उभे राहतात, पण अचानक एक स्कूटर चालक झोपलोल्या तरुणाच्या अंगावरुन गाडी घालून पळून जातो. दरम्यान, ही घटना नेमकी कुठ घडली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
अचानक झालेला हा प्रकार पाहून त्या तरुणांना धक्का बसतो. स्कूटर चालक चिरडून पळून गेल्यानंतर झोपलाला तरुण उठतो आणि अंग झटकू लागतो. सुदैवाने स्कूटीने चिरडल्याने मुलाला गंभीर दुखापत होत नाही. सुपरटोविप नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला असून, व्हिडिओवर पाहिल्यानंतर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.