माझा भाऊराया! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बहिणीला पाहताच भावाचा कंठ आला दाटून, ह्रदयस्पर्शी VIDEO पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:19 PM2024-04-30T16:19:39+5:302024-04-30T16:26:16+5:30

इन्स्टाग्रामवर भावा- बहिणीच्या नात्याचं महत्व अधोरेखित करणारा एक भावूक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

a young girl who fighting cancer meet her older siblings after 2 weeks apart video goes viral on social media  | माझा भाऊराया! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बहिणीला पाहताच भावाचा कंठ आला दाटून, ह्रदयस्पर्शी VIDEO पाहा

माझा भाऊराया! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बहिणीला पाहताच भावाचा कंठ आला दाटून, ह्रदयस्पर्शी VIDEO पाहा

Social Viral : भाऊ आणि बहिणीचं नातं हे अतूट असतं. एकमेकांसोबत भांडणारे तसेच प्रसंगी दंगा मस्ती केल्याशिवाय यांचा दिवसच जात नाही. बहीण या शब्दातच प्रेम, माया, आपुलकी तसेच जिव्हाळा दडलाय. 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भावनांना साद घालणारा एक व्हिडिओ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने पीडित असलेली एक लहान मुलगी आपल्या भाऊ आणि बहिणीला बऱ्याच दिवसानंतर भेटते. जवळपास २ आठवड्यानंतर या भावंडांची भेट होते. त्यामुळे आपल्या बहिणीच्या काळजीने गहिवरून गेलेल्या त्या भावाचा कंठ दाटून येतो आणि तो ढसाढसा रडू लागतो. लाडक्या बहिणीला मिठी मारताच त्याला अश्रू अनावर होतात आणि तो ढसाढसा रडू लागतो. व्हायरल होत असलेला गोड व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

या व्हायरल व्हिडिओमध्ये सुरूवातीला एक लहान मुलगी हॉस्पिटलच्या कॉरिडोरमध्ये आपल्या भावंडांना भेटण्याकरिता धावत जाताना दिसते आहे. दरवाज्यापर्यंत पोहचल्यानंतर आपल्या मोठ्या भाऊ आणि बहिणीला समोर पाहताच ती खुश होते. पण ही लहानगी मुलगी त्यांना मिठी मारत स्तब्ध उभी राहते. 

आजारपणात २ आठवडे ऑन्कोलॉजी वॉर्डमध्ये असल्याने या भावंडांना तिला भेटता आला नाही. अखेर त्यांची भेट ज्या क्षणी होते तेव्हा घडलेला प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. जवळपास १.३ मिलीयनहून  अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय व्हिडिओवर ' परमेश्वरा, या लहान मुलीला लवकरात लवकर बरी करं '' अशी प्रार्थना एका नेटकऱ्याने केली आहे. 

Web Title: a young girl who fighting cancer meet her older siblings after 2 weeks apart video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.