लाईव्ह शो दरम्यान महिला अ‍ॅंकरच्या तोंडात गेली माशी; पुढे जे काही घडलं ते तुम्हीच बघा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:10 IST2024-05-30T14:05:45+5:302024-05-30T14:10:06+5:30

सोशल मीडियावर सध्या एका न्यूज अ‍ॅंकरचा व्हायरल होणारा व्हिडिओ चर्चेत आलाय. 

a viral video of news anchor swallowed a fly that flew into her mouth during live telecast  | लाईव्ह शो दरम्यान महिला अ‍ॅंकरच्या तोंडात गेली माशी; पुढे जे काही घडलं ते तुम्हीच बघा 

लाईव्ह शो दरम्यान महिला अ‍ॅंकरच्या तोंडात गेली माशी; पुढे जे काही घडलं ते तुम्हीच बघा 

Social Viral: सोशल मीडियाने माणसाचं दैनंदिन जीवन पूर्णपणे व्यापून टाकलं आहे. त्याच्या  वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममुळे संपूर्ण जग माणसाच्या मुठीतच आलंय जणू.  जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे काय चाललंय याची इत्यंभूत माहिती येथे मिळते. आता इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडिओच बघा ना. 

सध्या बोस्टन २५ या न्यूज चॅनेलच्या महिला अ‍ॅंकरचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत आहे. त्यामागील कारणही तसंच आहे. लाईव्ह शो दरम्यान या महिलेच्या तोंडात माशी उडून गेली आणि  तिने पुढे जे काही केलं त्याच्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्या महिलेला प्रचंड ट्रोल केलंय. व्हेनेसा वेल्च असं या अ‍ॅंकरचं नाव आहे.  बातम्या सांगत असताना या महिलेच्या तोंडावर चुकून माशी उडून जाते त्यानंतर तिने जे काही केलं ते पाहून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावलाय. 

झालं असं की, लाईव्ह शो चालू असताना या अ‍ॅंकरसोबत एक मजेदार किस्सा घडला. ही अ‍ॅंकर जेव्हा ऑन कॅंमेरा निवेदन करत असते त्याच क्षणी माशी तिच्या चेहऱ्यासमोर घोंगावताना दिसते आहे. पण ती त्याकडे दुर्लक्ष करत आपलं काम चालूच ठेवते. अखेर ती माशी तिच्या पापण्यांवरून तोंडात घुसते. पण आश्चर्याची बाब म्हणजे तिथेच थांबण्याऐवजी ही अ‍ॅंकर माशी गिळते आणि तिचं बुलेटिन पुढे चालूच ठेवते. हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट हसत आहेत. 

एक्सवर @Mister_Nikita_X या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. बोस्टन २५ ची अ‍ॅंकर माशी गिळते आणि तिचं बुलेटिन सुरूच ठेवते. काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

या व्हिडिओवर तर सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट्सचा मारा केल्याचं चित्र आहे. त्यावर एक नेटकरी म्हणतो, "किती प्रोफशनल आहे ही अ‍ॅंकर, काही भीती नाही, काही रिअ‍ॅक्शन नाही. तिच्या जागी कोणी दुसरी असती तर तिने असं केलंच नसतं जे या अ‍ॅंकरने केलं". तसेचआणखी एक यूजरने कमेंट केलीय तो म्हणतोय, "बिचारी! तिच्या कामाची हीच परिभाषा असावी" अशा गमतीशीर प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: a viral video of news anchor swallowed a fly that flew into her mouth during live telecast