पायाला चोच मारली म्हणून तरुणीला आला राग, कोंबड्याची मानगुटीच धरली अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 16:15 IST2024-05-04T16:11:49+5:302024-05-04T16:15:13+5:30

सध्या सोशल मीडियावर एका कोंबड्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ चर्चेचा मुद्दा बनला आहे.

a viral video of a young girl beat to cock by teas her leg funny fighting video goes viral on social media | पायाला चोच मारली म्हणून तरुणीला आला राग, कोंबड्याची मानगुटीच धरली अन्... 

पायाला चोच मारली म्हणून तरुणीला आला राग, कोंबड्याची मानगुटीच धरली अन्... 

Social Viral : सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. इंटरनेटवर कधी काय पाहायला मिळेल याची काही शाश्वती नाही. माणसांप्रमाणेच वेगवेगळ्या प्राण्यांचे तसेच पक्ष्यांचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी पोपट मालकाची नक्कल करताना दिसतो तर कधी घराच्या दारात मालकाची वाट पाहणारा कुत्रा दिसतो,  मुक्या जनावरांचे असे व्हिडिओ मनाला कायम भिडतात. अलिकडे एक्सवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ अनेकांच्या नजरेत आला आहे. 

रस्त्यावरून जाताना पायाला चोच मारली म्हणून एका तरुणीने चक्क एका कोंबड्याची शाळा घेतली. व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावरून जात असताना अचानक लाल रंगाचा बोचरा कोंबडा  तरुणीच्या अंगावर धावत जातो. तिच्या पायाला चोच मारतो. पण त्या तरुणीला राग अनावर होतो आणि ती त्या कोंबड्याला बेदम मारहाण करते. त्याच्या कानफाटात मारत कोंबड्याची मानगुटी धरत त्याला ही मुलगी हवेत गरगर फिरवते. जमीनीवर जोरात फेकते, ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे. 

एक्सवर Ghar ke kalesh या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर गमतीशीर प्रतिक्रिया केल्या आहेत.  तर काही यूजर्सनी 'PETA' ने या तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: a viral video of a young girl beat to cock by teas her leg funny fighting video goes viral on social media