हुबेहुब गाडीच्या सायरनसारखा आवाज काढत पोलिसांची घेतली मजा; पक्षांचा Video पाहून हसू आवरणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:03 PM2024-04-13T17:03:41+5:302024-04-13T17:06:53+5:30

काही पक्षी किंवा प्राणी असेही असतात जे आपल्या आजुबाजुला ऐकू येणाऱ्या प्रत्येक आवाजाची नकल करत असतात. विशेष म्हणजे पक्षांच्या काही प्रजाती एखादा आवाज हुबेहुब काढण्यात पारंगत असतात. 

a viral video of a birds mimic like siren sound of vehicle police was shocked after listening voice of birds | हुबेहुब गाडीच्या सायरनसारखा आवाज काढत पोलिसांची घेतली मजा; पक्षांचा Video पाहून हसू आवरणार नाही 

हुबेहुब गाडीच्या सायरनसारखा आवाज काढत पोलिसांची घेतली मजा; पक्षांचा Video पाहून हसू आवरणार नाही 

Social Viral : जैवविधतेने नटलेल्या या सृष्टीत काही पक्षी असेही आढळतात जे कैमोफ्लेजच्या माध्यमातून आपल्या शरीराचा  रंग बदलतात.  या अनोख्या कलेच्या जोरावर ते ज्या ठिकाणी बसतील अगदी तसाच पिसांचा रंग बदलण्याची त्यांची ही अनोखी कला वाखाणण्याजोगी आहे. याउलट काही प्राणी- पक्षीही त्यांच्या आजुबाजुला ऐकू येणाऱ्या आवाजाची हुबेहुबे नकल करतात. पोपट हे याचं उत्तम उदाहरण आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कॉपीमास्टर पक्षाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याने चक्क यूकेमधील पोलिसांना वेड्यात काढलंय.

त्याचं झालं असं, यूकेमझधील पोलिसांना त्यांच्या गाडीच्या जवळपास वारंवार सायरनचा आवाज ऐकू येत होता. हे पक्षी काढत असलेला सायरनचा आवाज इतका हुबेहुब मिळता- जुळता होता की कोणालाही शंका येणार नाही. समोरून पोलिसांची गाडी येते की काय असा भास सहज कोणालाही होऊ शकतो. अगदी सेम-टू-सेम गाडीच्या सायरनचा येणाऱ्या या आवाजामुळे पोलिस देखील संभ्रमात पडले.आपल्या कारच्या पेट्रोलिंग सिस्टिममध्ये काहीतरी बिघाड झाला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी लावला. पण हा आवाज गाडीच्या सायरनचा नसून पक्षांचा आहे, ही गोष्ट त्यांना काही कालावधीनंतर समजली.

सुरुवातीला व्हिडिओमध्ये हे पक्षी झाडावर बसलेले आहेत. त्यानंतर थोड्या अवधीनंतर त्यांनी त्या गाडीच्या सायरनसारखा आवाज काढायला चालु केला. याचा व्हिडिओ यूके पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यावर काही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स सुद्धा केल्या आहे. ''ही पोलिसांची स्पेशल ब्रॉंच आहे'', ''पोलिसांची अशी गंमत करणाऱ्या या पक्षांवर कारवाई झालीच पाहिजे'' अशा मजेशीर प्रतिक्रिया त्यांनी केल्या आहेत.

Web Title: a viral video of a birds mimic like siren sound of vehicle police was shocked after listening voice of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.