शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी चहाच्या दुकानात घुसली, भीषण दृश्य CCTVत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:07 IST

Viral Video On Social Media: पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी चहाच्या दुकानात शिरल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुकानात चहा बनवला जात होता. काही लोक खाटेवर पडून मोबाईल पाहत होते, तर काही खुर्चीवर बसले होते. अशातच नियंत्रण सुटलेला पिकअप दुकानात शिरला आणि मोठी दुर्घटना घडली. खरं तर पिकअप यायच्या आधी सर्वकाही सुरळीत चालले होते मात्र अचानक गाडी दुकानात शिरते आणि एकच खळबळ माजते. गाडी आत येताच लोक इतरत्र धावू लागतात, पण पिकअप चालूच राहते अन् सगळ्यांची धाकधुक वाढवते. 

भीषण दृश्य CCTVत कैद हा भीषण अपघात दुकानातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, ज्याने सोशल मीडियावरील युजर्सच्या अंगावर काटा आणला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सर्व काही इतक्या वेगाने घडते की लोकांना पळून जाण्याची संधी देखील मिळत नाही. या दुर्घटनेत किती जण जखमी झाले आहेत, याची अद्याप माहिती समोर आली नाही. दरम्यान, ही घटना सुरतमधील असल्याचा दावा केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार हा अपघात 17 डिसेंबर रोजी झाला होता.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

सर्वांना चिंतेत टाकणारा हा व्हिडीओ @bhaiyaji25 या ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले, "सूरत: असे सुद्धा अपघात होतात का…". सर्वांच्या अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, खूप भयानक. तर दुसर्‍याने लिहिले की आयुष्य असेच आहे, कधीही काहीही होऊ शकते. त्याच वेळी बऱ्याच युजर्संनी लिहिले म्हटले की मृत्यूला टाळणे अशक्य आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाSuratसूरतAccidentअपघात