२१ वर्षीय तरुणाने ५२ वर्षांच्या मुलीशी केला विवाह; दोघांनी दिली प्रतिक्रिया, म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 20:10 IST2022-12-12T20:09:48+5:302022-12-12T20:10:05+5:30

२१ वर्षीय तरुणाने ५२ वर्षांच्या मुलीशी विवाह केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

A video of a 21-year-old man marrying a 52-year-old girl has surfaced. | २१ वर्षीय तरुणाने ५२ वर्षांच्या मुलीशी केला विवाह; दोघांनी दिली प्रतिक्रिया, म्हणतात...

२१ वर्षीय तरुणाने ५२ वर्षांच्या मुलीशी केला विवाह; दोघांनी दिली प्रतिक्रिया, म्हणतात...

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास प्रसंग असतो. लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. सध्या असेच एक लग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहून लोकांचा विश्वास बसत नाही. हा विवाह लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

लग्नासाठी प्रेम आणि आदर खूप महत्त्वाचा असतो. लग्न हा एक मोठा निर्णय आहे, जो आयुष्यभर पाळावा लागतो. त्यामुळेच लग्नाचा निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्यावा असे म्हणतात. मात्र याचदरम्यान एका २१ वर्षीय मुलाने ५२ वर्षांच्या तरुणीशी लग्न केले. सदर लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो मुलगा म्हणतोय की, आता माझे लग्न झाले आहे. प्रेमाला वय नसते. माणसाचे हृदय पाहिले जाते, जर हृदय चांगले असेल तर सर्वकाही चांगले आहे. तर ५२ वर्षांची नववधू म्हणतेय, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्यांना ३ वर्षांपासून ओळखते. सदर व्हिडिओवर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुला आईच्या बरोबरीच्या स्त्रीशी लग्न करायला लाज वाटली नाही का?, असा सवाल एका युजर्सने विचारला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: A video of a 21-year-old man marrying a 52-year-old girl has surfaced.

टॅग्स :marriageलग्न