Pathan च्या गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:11 IST2022-12-29T13:11:29+5:302022-12-29T13:11:52+5:30
Trending Pathan Dance Video: या व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर एक महिला पूर्ण उत्साहात नाचताना दिसत आहे.

Pathan च्या गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल, तुम्ही पाहिलात का?
मौज मजेसाठी कोणतंही वय नसतं. वय ही केवळ एक संख्या आहे. तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटू शकता. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला शाहरुख खानच्या आगामी चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
साज खान नावाच्या महिलेनं आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. शाहरुख खानच्या आगामी पठाण या चित्रपटाच्या टायटल साँगवर ती महिला थिरकताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. महिला आपल्या घराबाहेर असलेल्या जागेत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
इन्स्टावर लाखो फॉलोअर्स
या महिलेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 347K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या रिलमध्ये ती महिला पठाणच्या टायटल साँगवर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.