Video : विमान हवेत झेपावलं, पाकिस्तानी प्रवाशाचं डोकं फिरलं; सिट्सवर बुक्का, पायानं काच तोडण्याचा प्रयत्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:54 IST2022-09-19T14:52:35+5:302022-09-19T14:54:20+5:30

Pakistan news: पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सचं विमान पेशावरहून दुबईसाठी हवेत झेपावलं अन् नंतर विचित्रच गोंधळ पाहायला मिळाला.

A passenger onboard a Pakistan International Airlines (PIA) flight enroute to Dubai from Peshawar, allegedly created a ruckus on the plane mid-air, Video  | Video : विमान हवेत झेपावलं, पाकिस्तानी प्रवाशाचं डोकं फिरलं; सिट्सवर बुक्का, पायानं काच तोडण्याचा प्रयत्न अन्...

Video : विमान हवेत झेपावलं, पाकिस्तानी प्रवाशाचं डोकं फिरलं; सिट्सवर बुक्का, पायानं काच तोडण्याचा प्रयत्न अन्...

Pakistan news: पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सचं विमान पेशावरहून दुबईसाठी हवेत झेपावलं अन् नंतर विचित्रच गोंधळ पाहायला मिळाला. विमान आकाशात असताना पाकिस्तानातील एका माथेफिरू प्रवाशाने अंगावरील शर्ट काढून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तो अचानक त्याच्या जागेवरून उभा राहिला, सिट्सना बुक्का मारू लागला, पायाने विमानाची काच तोडण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यानंतर त्याने विमानातील कर्मचाऱ्यांसोबतही हुज्जत घातली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. एअरलाईन्सने प्रवाशाला ब्लॅकलिस्ट केले आहे. 

Geo News चे पत्रकार तन्वीर खटाना यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला.  




सिट्सना ठोसा व काचेवर लाथ मारून झाल्यानंतर या प्रवाशाने लोटांगण घातले. त्याला अडवायला गेलेल्या कर्मचाऱ्यांशीही त्याने मारामारी केल्याचा दावा केला जातोय. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी त्या प्रवाशाला बांधून ठेवले. दुबईत लँड करताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केलं गेलं. 

Web Title: A passenger onboard a Pakistan International Airlines (PIA) flight enroute to Dubai from Peshawar, allegedly created a ruckus on the plane mid-air, Video