शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

VIDEO:"शिक्षक खूप अभ्यास देतात काय करू?, चिमुकल्या मुलीने केली थेट PM मोदींकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:02 IST

एका लहान मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडे आपल्या शिक्षकांची तक्रार केली आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी मनोरंजन करतात तर काही गोष्टी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर सर्वांनाच हसू आवरत नाही. मात्र व्हिडीओ पाहून लहानग्यांचा याबाबतीत खरोखर विचार व्हायला हवा असे काही युजर्संनी म्हटले आहे. कारण या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीने आपले शिक्षक जास्त अभ्यास देतात अशी तक्रार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

"माझ्या शाळेतील शिक्षक खूप अभ्यास देतात त्यामुळे मला खेळायला वेळ मिळत नाही. एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास त्यामुळे माझी आई देखील त्रस्त झाली आहे. या प्रकरणी माझ्या शिक्षकाशी बोलून मुलांना इतके काम देऊ नये असे त्यांना सांगा," असे आवाहन या मुलीने पंतप्रधानांना केले. 

मुलीने केली थेट मोंदींकडे तक्रार पंतप्रधान मोदींना आपल्या शालेय जीवनातील व्यथा सांगताना मुलीने म्हटले, हॅलो मोदीजी कसे आहात? माझे नाव अलीजा आहे. यानंतर मुलीने आपल्या शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या अती अभ्यासाचा पाढाच वाचून दाखवला. सतत काम असते आणि त्यांना पण माहिती नसते की किती अभ्यास असतो. मोदीजी तुम्हीच मुलांना खेळण्याचा सल्ला देत असता मग आम्ही अशा स्थितीत कसे खेळायचे असे म्हणत चिमुकलीने व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली. 

या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. मुलीच्या भावना ऐकून सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ @kumarayush084 या अकाउंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. लहान मुलांच्या खाद्यांवर एवढ्या अभ्यासाचा ताण हा गंभीर विषय असल्याचे अनेक युजर्संनी म्हटले आहे. त्यामुळे मोंदीजींनी या चिमुकलीच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे कारण ही लहान मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत, अशा विविध प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीTeacherशिक्षक