स्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; तरुणाने कंपनीच्या प्रसिद्ध रिसीपी सोशल मीडियावर केल्या शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:40 PM2023-10-16T12:40:18+5:302023-10-16T12:49:55+5:30

स्टारबक्स या प्रसिद्ध कॉफीहाऊसच्या एका माजी कर्मचाऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

A former Starbucks company employee shared the recipe of the most popular drinks on social media | स्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; तरुणाने कंपनीच्या प्रसिद्ध रिसीपी सोशल मीडियावर केल्या शेअर

स्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; तरुणाने कंपनीच्या प्रसिद्ध रिसीपी सोशल मीडियावर केल्या शेअर

स्टारबक्स या प्रसिद्ध कॉफीहाऊसच्या एका माजी कर्मचाऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. स्टारबक्स कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय ड्रिंक्सची रेसिपी त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका यूजरने हा दावा केला आहे. या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याने रेसिपी शेअर केली. ही पोस्ट शेअर होताच व्हायरल झाली. X वर एका युजरने लिहिले की, स्टारबक्सच्या एका कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने स्टारबक्सच्या सर्व पेय तयार करण्याच्या रेसिपी पोस्ट शेअर केल्या आहेत. 

माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हाईट चॉकलेट मोचा, कोकोनट मिल्क व्हॅनिला लट्टे, आइस्ड कारमेल, कोल्ड ब्रू विथ कोल्ड फोम यांचा समावेश आहे. ही पोस्ट १४ ऑक्टोबर रोजी X वर शेअर करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत याला ९.५३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याला २१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ५ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. तर मोठ्या संख्येने लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, 'आता आम्ही स्वतःचे कोल्डड्रिंक बनवू शकतो आणि स्वतःचे नाव लिहू शकतो. आम्ही तिला एरियन ग्रांडे किंवा काहीतरी म्हणू शकतो.' दुसरा युजर्स म्हणाला, 'मी ही पोस्ट सेव्ह केली आहे पण तरीही मी माझ्या कॉफीसाठी स्टारबक्सला जाईन.' तिसरा युजर्स म्हणाला की, 'तुम्ही घरी बनवल्यावरही तुम्हाला स्टारबक्सची चव आणि उत्साह मिळणार नाही.'

Web Title: A former Starbucks company employee shared the recipe of the most popular drinks on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.