जबरदस्त! ड्रायव्हरच्या बाजूला बसून परदेशी महिलेने चालवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:59 IST2024-08-17T15:32:09+5:302024-08-17T15:59:05+5:30
Viral Video : एक परदेशी महिला पर्यटक चक्क ऑटोरिक्षा चालवताना दिसत. इतकंच नाही तर तिने ड्रायव्हरला बाजूला बसवून रिक्षा चालवली.

जबरदस्त! ड्रायव्हरच्या बाजूला बसून परदेशी महिलेने चालवली रिक्षा, व्हिडीओ व्हायरल...
Viral Video : आजकाल भारतात फिरण्यासाठी आलेल्या परदेशी महिलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये परदेशी पर्यटक भारतातील फूड, लाइफस्टाईल एन्जॉय करताना दिसतात. अनेक महिला भारतीय लोकांसोबत गमती-जमती करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक परदेशी महिला पर्यटक चक्क ऑटोरिक्षा चालवताना दिसत. इतकंच नाही तर तिने ड्रायव्हरला बाजूला बसवून रिक्षा चालवली.
इन्स्टाग्राम यूजर ब्लेन @beachbumblaine एक कंटेंट क्रिएटर आहे. जी जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जाते. काही महिन्यांआधी ती भारतात आली होती आणि तेव्हा तिने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. आधी ती ड्रायव्हरसोबत बोलताना दिसली नंतर त्याच्यासोबतच समोर बसताना दिसली.
महिलेने व्हिडिओत सांगितलं की, तिची रिक्षा चालवण्याची ईच्छा झाली. नंतर ती ड्रायव्हरसोबतच त्याच्या सीटवर बसली आणि तिने रिक्षा चालवली. काही अंतरापर्यंत ती रिक्षा चालवते आणि नंतर ड्रायव्हरच्या हाती देते.
या व्हिडिओला आतापर्यंत ५५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक लोकांनी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, "ड्रायव्हर या दिवशी चांगली स्माईल घेऊन झोपला असेल". दुसऱ्याने लिहिलं की, "ड्रायव्हरचे मित्र तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही की, त्याच्यासोबत असं काही झालं". तर तिसऱ्याने लिहिलं की, "हा या व्यक्तीच्या जीवनातील सगळ्यात चांगला दिवस ठरला असेल". लोक अशा अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.