'तेरे बिना भी क्या जीना...' प्रेमाची परिभाषा उलगडणारा 'Video' पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:09 IST2024-01-06T13:08:32+5:302024-01-06T13:09:54+5:30

सोशल मीडियावर पती-पत्नीच्या नात्यामधील प्रेमाचा ओलावा दाखवणारा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

A beautiful video of old couple her care and love will shows in video this video goes viral on social media  | 'तेरे बिना भी क्या जीना...' प्रेमाची परिभाषा उलगडणारा 'Video' पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल 

'तेरे बिना भी क्या जीना...' प्रेमाची परिभाषा उलगडणारा 'Video' पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल 

Viral Video : नवरा-बायको म्हणजे दोन शरीर एक जीव असं नातं असतं. तन-मनाने ते एकमेकांशी जोडलेले असतात. हे अगदीच नाजुक समजल्या जाणाऱ्या नवरा-बायकोच्या नात्यामध्ये खूप जवळीक असते. लग्नाआधी एकमेकांसाठी अनोळखी असणारे हे दोन जीव लग्नानंतर कधी एकरुप होतात हे त्यांच त्यांनाच कळत नाही. 

हल्ली लग्नानंतर नवरा- बायकोमध्ये प्रेम जास्त वेळ टिकत नसल्याच्या तक्रारी अनेकदा कानावर येतात. कौंटुबिक जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामात व्यस्त असल्याने एकमेकांना वेळ देणं कठीण होऊन बसलंय. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊन घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ नवरा-बायकोच्या प्रेमाची परिभाषा सांगणारा आहे. 

सोशल मीडियावर नवरा-बायकोमध्ये होणारे वाद-विवाद दाखवणारे किंवा संसाराच्या रहाटगाड्यात सापडलेल्या नवऱ्याची व्यथा मांडणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ अशा कपल्सच्या डोळ्यात झणझणीत अंजण ओतणारा आहे. एक वयोवद्ध आजोबा आपल्या पत्नीची कशा प्रकारे काळजी घेतायत हे दाखवणारा हा व्हिडीओ पाहून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याच्या शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणारं हे वयोवद्ध जोडपं नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलंय. 

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबा आजीचे केस  विंचरताना दिसत आहेत. अगदी हळूवारपणे आजीच्या केसांची वेणी घातली आहे. आपल्या जोडीदाराबद्दल असलेलं प्रेम आजीच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतंय. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत एकमेकांना कशी साथ द्यावी याची प्रचिती हा व्हिडीओ पाहून येते. 

पाहा व्हिडीओ - 

काही दिवसांपूर्वीच व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शिवाय नेटकरी या व्हायरल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Web Title: A beautiful video of old couple her care and love will shows in video this video goes viral on social media