या वयात 'ही' महिला दिसते मुलांपेक्षाही लहान, हे आहे सौंदर्याचं गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 14:51 IST2018-10-31T14:51:19+5:302018-10-31T14:51:51+5:30

सध्या सोशल मीडियात ती चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या फोटोत दिसणारी ही महिला ५१ वर्षांची आहे यावर कुणाचा विश्वासच बसत नाहीये.

50 years old Mama Hadi become social media sensation and popular as Pushpa Devi | या वयात 'ही' महिला दिसते मुलांपेक्षाही लहान, हे आहे सौंदर्याचं गुपित!

या वयात 'ही' महिला दिसते मुलांपेक्षाही लहान, हे आहे सौंदर्याचं गुपित!

असे म्हणतात की, वेळेसमोर कुणाचच काही चालत नाही. आज जे तरुण आहेत ते उद्या वृद्ध होणार...चेहऱ्याचा तजेलदारपणा सुरकुत्यांमध्ये बदलेल...पण इंडोनेशियातील एक महिला या सगळ्या गोष्टींच्या उलट असे म्हटले तरी वावगे ठरु नये. ती तिच्या वाढत्या वयाला हरवताना दिसत आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियात ती चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या फोटोत दिसणारी ही महिला ५१ वर्षांची आहे यावर कुणाचा विश्वासच बसत नाहीये.

इंडोनेशियातील मामा हादी या महिलेला पाहून कुणीही अचंबित होतं. ती ५१ वर्षांची झाली असली तरी दिसायला मात्र १८ वर्षांचीच वाटते. त्यामुळे तिचे कितीतरी फोटो सोशल मीडियात व्हायरल आहेत. 

बरं फोटोचं जाऊन द्या...ही महिला ५१ वर्षांची असून ग्रॅज्यूएट झालेल्या दोन मुलांची आई आहे. इतकेच नाही तर त्यांचे एकत्र फोटो पाहून हेही लक्षात येतं की, ही महिला तिच्या मुलांपेक्षा कमी वयाची वाटते. 

मामा हादीने नुकताच तिचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिच्या मुलांनी तिला एक शानदार कार गिफ्ट केली आहे. 
या सौंदर्याचं रहस्य विचारल्यावर तिने सांगितले की, ती रोज एक्सरसाइज करते आणि संतुलित डाएट घेते. 

मामा हादी ही गेल्या १५ वर्षांपासून नियमीतपणे एक्सरसाइज करते आहे.

एक्सरसाइज सोबतच ती स्विमिंग आणि डान्सही करते. ज्या वयात महिला मोकळेपणाने वागणं टाळतात. त्या वयात ही महिला बिकीनी परिधान करते. 

Web Title: 50 years old Mama Hadi become social media sensation and popular as Pushpa Devi