या ५ वर्षाच्या चिमुकलीचे टँलेट जबरदस्त, भल्यामोठ्या कॅनव्हासवर काढलं असं पेंटिंग की बघतच रहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:44 IST2021-10-29T15:44:32+5:302021-10-29T15:44:42+5:30
एका ५ वर्षाच्या चिमुकलीच्या चित्रकलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे.

या ५ वर्षाच्या चिमुकलीचे टँलेट जबरदस्त, भल्यामोठ्या कॅनव्हासवर काढलं असं पेंटिंग की बघतच रहाल
मोठ्या माणसांच्या कलेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतात. मात्र कलेच्या बाबतीत लहान मुलंही काही कमी नाहीत. एका ५ वर्षाच्या चिमुकलीच्या चित्रकलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे. मुलीने बनवलेले पेंटिंग खूप सुंदर आहे, ज्यामध्ये काही कार्टून कॅरेक्टर दिसत आहेत.
या पेंटिंगमध्ये मुलीने कॅन्व्हॉसवर चित्र रेखाटताना फ्रॉक बदललेले दिसतात. हे पाहून असं दिसतं की, तिला पेंटिंग बनवण्यासाठी काही दिवस लागले असावेत. फार्स्ट फॉरवर्ड करुन हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, त्याला आतापर्यंत १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी तो रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध ट्विटर अकाउंट @buitengebieden_ ने शेअर केला आहे.
5-year-old artist doing her thing.. 👌 pic.twitter.com/R4g4idMMmA
— Buitengebieden (@buitengebieden_) October 25, 2021
सोशल मीडियावरही लोक त्या मुलीचे कौतुक करताना थकत नाहीत. एक व्यक्ती म्हणाली, “ही खूप प्रतिभावान कलाकार आहे, ही कला आयुष्यभर मुलीकडे राहिली पाहिजे.” त्याच वेळी, आणखी एक व्यक्तीने कमेंट केली की, “मुलीची प्रतिभा खरोखर अद्भूत आहे.”