१४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने जबरदस्ती ठेवले संबंध, त्यातून जन्माला आलं बाळ आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 17:29 IST2026-01-23T17:28:55+5:302026-01-23T17:29:41+5:30
Viral News : सध्या एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियातील एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याचं शोषण केलं आणि त्यातून ती प्रेग्नेंट झाली.

१४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेने जबरदस्ती ठेवले संबंध, त्यातून जन्माला आलं बाळ आणि मग....
Viral News : गुरु आणि शिष्याचं नातं हे जगात सगळ्यात पवित्र मानलं जातं. गुरु आपल्या शिष्याला जीवनाचं ज्ञान देत असतो, तर शिष्यासाठी गुरु देवाप्रमाणे असतो. पण काही देशांमध्ये या नात्याला मलिन करण्याचं काम सुरू आहे. सध्या एका घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियातील एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याचं शोषण केलं आणि त्यातून ती प्रेग्नेंट झाली. जेव्हा डीएनए टेस्ट करण्यात आली, तेव्हा तिचा हा कारनामा जगासमोर आला.
डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील एक विवाहित शिक्षिका नाओमी क्रेग हिच्यावर एका विद्यार्थ्यावर अत्याचार करण्याचा आणि त्याच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तिने १४ वर्षीय मुलाला आपल्या जाळ्यात ओढून २०२४ आणि २०२५ दरम्यान त्याच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवले. ३३ वर्षीय नाओमी त्यावेळी फ्रेडरिक इरविन एंजिलिकन स्कूलमध्ये नोकरी करत होते. या संबंधातून ती प्रेग्नेंट झाली. जेव्हा ती प्रसुती रजेवर गोती, तेव्हा तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला.
रिपोर्टनुसार, महिलेचं प्लेसेंटा सॅम्पल घेण्यात आलं होतं आणि डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यातून समोर आलं की, ज्या बाळाला तिने जन्म दिला ते त्या मुलाचं होतं ज्याचं शिक्षिकेने शोषण केलं होतं. नाओमी एक म्युझिक टीचर होती. तिने १६ वर्षाने लहान मुलांचं शोषण केलं होतं. आता तिला २७ जानेवारीला मॅनड्यूरा मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये नेण्यात येणार आणि तिच्यावर ३ अतिरिक्त कलमा लावण्यात येणार.
वेस्ट ऑस्ट्रेलिया पोलिसच्या कमिश्नरांनी सांगितलं की, असं समोर आलं आहे की, ज्या बाळाला महिलेने जन्म दिला, ते बाळ शोषण करण्यात आलेल्या मुलाकडून महिलेला झालं. पोलिसांनी यापेक्षा जास्त काही माहिती दिली नाही. पोलिसांनुसार, हा एक मोठा गुन्हा आहे.