भाजपात प्रवेश केलेल्या युवराज लखम सावंत-भोसलेंचे सावंतवाडीत आगमन, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 17:47 IST2022-05-06T17:45:20+5:302022-05-06T17:47:22+5:30
सावंतवाडी : संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सावंतवाडीत आगमन झाले. मात्र त्यांच्या स्वागताला भाजपचा जिल्हास्तरावरील एकही ...

भाजपात प्रवेश केलेल्या युवराज लखम सावंत-भोसलेंचे सावंतवाडीत आगमन, पण..
सावंतवाडी : संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सावंतवाडीत आगमन झाले. मात्र त्यांच्या स्वागताला भाजपचा जिल्हास्तरावरील एकही नेता फिरकला नाही. यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भाजपाच्या मोजक्याच काही माजी पदाधिकाऱ्यांकडून लखमराजेंचे भाजप परिवारात स्वागत अशा आशयाचा लावलेला बॅनर सावंतवाडीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. युवराज लखम हे सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, या प्रकारानंतर भाजपमधील अंतर्गत वाद स्पष्टच दिसून आला.
लखम यांनी मुंबई येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काल, गुरूवारी सावंतवाडीत दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या स्वागताला भाजपच्या जिल्हास्तरावरील नेत्यांनी पाठ फिरकली.
स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर स्वागताचा फक्त एक बॅनर झळकला. या बॅनरवर नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा भाजपचे माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, ॲड. परीमल नाईक,उदय नाईक, माजी गटनेते राजू बेग, माजी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, भाजपा विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद प्रभू या मोजक्याच भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटो होता. त्यामुळे हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरला.