दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:41 IST2021-05-07T15:39:27+5:302021-05-07T15:41:09+5:30
Accident Devgad Sindhudurg : कात्रादेवी मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सागवे येथील ताबीश तालीब काझी (२२) हा तरुण ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३०च्या सुमारास झाला.

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्देदुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यूअधिक तपास देवगड पोलिसांकडे
देवगड : कात्रादेवी मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सागवे येथील ताबीश तालीब काझी (२२) हा तरुण ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३०च्या सुमारास झाला.
याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ताबीश तालीब काझी हा मंगळवारी सकाळी सागवे कात्रादेवी मार्गावरून दुचाकीने घरी जात असताना सागवे हमदारेवाडी येथे दुचाकी घसरून होऊन अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला नागरिकांनी उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मोहिद्दीन अली काझी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.