युवा उद्योजकांनी घेतली नारायण राणेंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 13:52 IST2021-07-20T13:51:44+5:302021-07-20T13:52:39+5:30

Kankavali NarayanRane Sindhudurg : मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव तथा युवा उद्योजक प्रताप भोसले व शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगावकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांनी नवनिर्वाचित केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेतली.

Young entrepreneurs met Narayan Rane | युवा उद्योजकांनी घेतली नारायण राणेंची भेट

दिल्ली येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन मराठा सेवा संघाचे कोकण सचिव प्रताप भोसले व मुदस्सर शिरगावकर यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत संतोष चव्हाण उपस्थित होते.

ठळक मुद्देयुवा उद्योजकांनी घेतली नारायण राणेंची भेटउद्योगधंदेविषयी भोसले यांनी केली राणे यांच्याशी चर्चा

कणकवली : मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव तथा युवा उद्योजक प्रताप भोसले व शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगावकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांनी नवनिर्वाचित केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेतली.

यावेळी कोकणच्या विविध प्रश्न, समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. प्रताप भोसले, शिरगावकर यांनी राणे यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामे , उद्योगधंदे याविषयी भोसले यांनी राणे यांच्याशी चर्चा केली.

कोकणच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री राणे यांनी यावेळी दिली.
मंत्री दानवे यांचीही रेल्वेभवन येथे भेट घेण्यात आली. कोकण रेल्वेच्या विविध समस्या सोडविण्याची ग्वाही देखील दानवे यांनी दिली. याप्रसंगी नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक संतोष चव्हाण तसेच इतर उद्योजक उपस्थित होते.

 

Web Title: Young entrepreneurs met Narayan Rane