डोक्यात दगड पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाणीत कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:03 IST2017-12-11T15:58:33+5:302017-12-11T16:03:17+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालजवळील हेदुळ येथील खाणीमध्ये झालेल्या दुर्घटनेत सोमवारी दुपारी एक कामगार ठार झाला. या खाणीत दगड माती भरण्याचे काम सुरु असतानाच हा अपघात घडला. यासंदर्भात कट्टा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.

डोक्यात दगड पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाणीत कामगाराचा मृत्यू
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसालजवळील हेदुळ येथील खाणीमध्ये झालेल्या दुर्घटनेत सोमवारी दुपारी एक कामगार ठार झाला.
मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील एका खाणीमध्ये काम करत असताना भला मोठा दगड अंगावर पडल्याने इराना अमरपा चव्हाण (वय ५0, मूळ रा. कर्नाटक) हे जागीच ठार झाले. इराना यांच्या डोक्यातच दगड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मालवण तालुक्यातील हेदुळ या गावात काळ्या दगडाची खाण आहे. या खाणीतून काळ दगड खणून काम करण्याचे काम गेले कित्येक महिने सुरु आहे. या खाणीत दगड माती भरण्याचे काम सुरु असतानाच हा अपघात घडला. यासंदर्भात कट्टा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे.