बँक कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:15 IST2019-10-17T15:14:33+5:302019-10-17T15:15:58+5:30
सिंधुदुर्गनगरी : को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सर्व सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखा व प्रधान कार्यालयात बँक कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या धाकदपटशाहीला ...

को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून काम केले.
ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकर्मचाऱ्यांवर होणाऱ्या धाकदपटशाहीला विरोध
सिंधुदुर्गनगरी : को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या सर्व सदस्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखा व प्रधान कार्यालयात बँक कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या धाकदपटशाहीला विरोध दर्शवित मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. तसेच आपला निषेध व्यक्त केला.
यावेळी संघटनेचे सर्व सदस्य ठामपणे बँक कर्मचाऱ्यांच्या मागे रहातील असे मत को-आॅपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी नितीन शेट्ये यांनी व्यक्त केले. तसेच कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.