शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी बस रोखली ; केसरी येथील प्रकार : आक्रमक पवित्रा घेत केला प्रश्नांचा भडिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 20:34 IST

एसटी बस वेळेमध्ये आली पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली. तसे लेखी द्या, अशीही या महिलांनी मागणी केली. पण आम्हांला लेखी आश्वासन देता येत नाही.

ठळक मुद्देसोमवारी यावर प्रशासनाचे अधिकारी तोडगा काढतील, असे सांगितल्यानंतर बस पुन्हा सावंतवाडीकडे रवाना झाली.

सावंतवाडी : सावंतवाडी-फणसवडे एसटी बस गेले  काही दिवस सातत्याने अनियमित वेळेत येत असल्यामुळे संतप्त महिलांनी केसरी येथे बस रोखून धरली. यावेळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत वाहक व चालकावर प्रश्नांचा भडिमार केला.‘आम्हांला एसटी वेळेत सोडणार असे लेखी आश्वासन द्या’, अशी मागणी महिलांनी वाहक व चालकांकडे  केली. पण वाहक व चालकाने ‘आज रविवार असल्याने एसटी प्रशासनाचे अधिकारी कोणीही हजर नाहीत. तुम्ही सोमवारी येऊन आगारप्रमुखांशी बोला’, असे सांगितले. पण लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही एसटी सोडणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला.

यावेळी  केसरी-फणसवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच देवेंद्र सावंत यांनी आपण सोमवारी आगारप्रमुखांशी बोलून एसटीची वेळ सुरळीत करतो, असे आश्वासन दिल्यानंतर यावर तोडगा काढल्यानंतर एसटी पुन्हा रवाना करण्यात आली. मात्र, यापुढे एसटी बस वेळेमध्ये आली पाहिजे, अशी मागणी लावून धरण्यात आली. तसे लेखी द्या, अशीही या महिलांनी मागणी केली. पण आम्हांला लेखी आश्वासन देता येत नाही. सोमवारी यावर प्रशासनाचे अधिकारी तोडगा काढतील, असे सांगितल्यानंतर बस पुन्हा सावंतवाडीकडे रवाना झाली.          चालक-वाहक यांना धरले धारेवर; सरपंचांनी केली मध्यस्थीसावंतवाडीहून फणसवडेकडे जाण्यासाठी केसरीतून एसटी बस आहे. मात्र, ही एसटी बस अनेक दिवस उशिराने धावत होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत जाणाºया मुलांना किंवा प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संतप्त महिलांनी ही बस अडविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे रविवारी सकाळी एसटी बस केसरी येथे अडविण्यात आली. यावेळी महिलांनी चालक-वाहकांना धारेवर धरले. मात्र, रविवार असल्याने कोणताही प्रशासकीय अधिकारी कार्यरत नसल्याने यावेळी सरपंचांच्या मध्यस्थीने त्यावर पडदा टाकण्यात आला.केसरी येथे संतप्त महिलांनी एसटी बस रोखून धरली.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग