शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

महिला, पुरुष गटाच्या कुस्ती स्पर्धां

By admin | Updated: November 16, 2014 23:53 IST

शनिवार दि. २२ रोजी दुपारी २ वाजता भाई विलणकर जिम व उत्कर्ष मित्रमंडळ, शांतीनगर, नाचणेरोड, रत्नागिरी येथे

रत्नागिरी : जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील वरीष्ठ गट गादी व माती, कुमारगट, महिलागट व ग्रिको रोमन जिल्हा अजिंक्यपदाच्या कुस्ती स्पर्धा शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भाई विलणकर जिम व उत्कर्ष मित्रमंडळ, शांतीनगर यांचे संयुक्त विद्यमाने, भवानी मंडप, शांतीनगर, नाचणेरोड, रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहेत.यासाठी कुमार कुस्तीगीरांचे वय १७ वर्षेपर्यंत असणे आवश्यक असून दिनांक १ जानेवारी १९९८ पासून पुढे जन्मलेल्या कुमार कुस्तीगीरांना स्पर्धेत भाग घेता येईल. यासाठी जन्मतारखेचा रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेचा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, नगर परिषद जन्मदाखला मुळप्रतीमध्ये आणणे आवश्यक आहे. तसेच वरीष्ठ गट कुमारगट, महिलागट व ग्रिको रोमन गट कुस्तीगीरांचे वास्तव्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी रेशनकार्ड किंवा जन्मदाखला पुराव्यासाठी मुळप्रतीत आणणे आवश्यक आहे. वास्तव्याबाबत शंका आल्यास किंवा तक्रार आल्यास असोसिएशनचा निर्णय अंतिम राहिल.तरी कुस्तीगीरांनी खेळण्याच्या गणवेशासह दिनांक २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भवानी मंडप, शांतीनगर, नाचणेरोड, रत्नागिरी उपस्थित रहावे. तेथे आपले प्रवेश अर्ज स्वीकारले जातील. वरीष्ठ गट राज्यस्पर्धा नाशिक जिल्हा, कुमारगट राज्यस्पर्धा पुणे जिल्हा येथे होणार आहेत. वरीष्ठ गट कुस्ती स्पर्धेसाठी वजन गट ५५ किलो, ६० किलो, ६६ किलो, ७४ किलो, ८४ किलो, ९६ किलो व ८४ ते १२० किलोपर्यंत. महिला कुस्ती स्पर्धेसाठी वजन गट ४८ किलो, ५१ किलो, ५५ किलो, ५९ किलो, ६३ किलो, ६७ किलो व ७२ किलोपर्यंत, महाराष्ट्र केसरीगट कुमार कुस्तीगीर स्पर्धेसाठी वजन गट पुढीलप्रमाणे आहे. ४२ किलोपर्यंत, ४६ किलो, ५० किलो, ५४ किलो, ५८ किलो, ६३ किलो, ६९ किलो, ७६ किलो, ७६ ते १०० किलो असे आहेत. अधिक माहितीसाठी अध्यक्ष श्रीकृ ष्ण विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)