Sindhudurg: इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू, सावंतवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:57 AM2024-05-27T11:57:56+5:302024-05-27T11:58:16+5:30

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील इमारतीच्या  दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडल्यामुळे अंजली वामन चव्हाण (वय ५५) ही महिला जागीच ठार ...

Woman dies after falling from building in Sawantwadi | Sindhudurg: इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू, सावंतवाडीतील घटना

Sindhudurg: इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू, सावंतवाडीतील घटना

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील इमारतीच्या  दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडल्यामुळे अंजली वामन चव्हाण (वय ५५) ही महिला जागीच ठार झाली ही घटना जिमखाना मैदाना समोरील हरिहरेश्वर सकूलात घडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचाच जागीच मृत्यू झाला, असा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अंजली चव्हाण या  हरिहरेश्वर संकुलात मध्ये राहत होती. तिच्या डोळ्यावर १५ दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती त्यामुळे तिला नीटसे दिसत नव्हते.त्यातच आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ती बाहेर वाळत घातलेले टॉवेल काढत असताना तिचा अचानक तोल गेला व ती दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली सकूलाच्या परिसरात कोसळली.त्यानंतर लागलीच १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला सावंतवाडीतील  कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तत्पूर्वीच तिचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेली कित्येक वरषे ती आपल्या भावांच्या घरी राहत होती.घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे.पोलिसांनी अक्समित मृत्यूची नोंद केली आहे.दरम्यान अंजली चव्हाण यांच्या पश्चात भाऊ वहिनी भाचे असा परिवार असून रेल्वेतील कर्मचारी दिनेश चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी राजन चव्हाण यांची ती बहिण होत.

Web Title: Woman dies after falling from building in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.