शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

कामगार विरोधी तरतूदी तत्काळ मागे घ्या !भारतीय मजदूर संघाच्यावतीने मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 4:01 PM

Tahshil office, bmsworker, Kankavli, sindhudurgnews केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मजूर कायद्यामधील तरतुदीच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली . मजूर कायद्यामधील कामगार विरोधी तरतुदी तत्काळ मागे घ्याव्यात , अन्यथा तीव्र आंदोलन करून सरकारला जागे करावे लागेल , असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच तहसीलदार आर . जे . पवार यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकामगार विरोधी तरतूदी तत्काळ मागे घ्या !भारतीय मजदूर संघाच्यावतीने मागणी कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने

कणकवली : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मजूर कायद्यामधील तरतुदीच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली . मजूर कायद्यामधील कामगार विरोधी तरतुदी तत्काळ मागे घ्याव्यात , अन्यथा तीव्र आंदोलन करून सरकारला जागे करावे लागेल , असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच तहसीलदार आर . जे . पवार यांना निवेदन देण्यात आले.भारतीय मजदूर संघाने केंद्र शासनाने आणलेल्या नविन कामगार कायद्यातील तरतुदीना विरोध दर्शविला आहे . कायद्यातील औद्योगीक संबंधसंहिता २०२० , औद्योगिक सुरक्षा , आरोग्य आणि सेवाशर्ती संहिता २०२० यातील काही तरतुदीमुळे कामगारांचे अधिकार धोक्यात येणार असल्याचे मजदूर संघाचे म्हणणे आहे . त्यामुळे याविरोधात मजदूर संघाने देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गतच येथील तहसीलदार कार्यालयासमोर हि निदर्शने करण्यात आली . तसेच उपस्थित कामगारांनी जोरदार घोषणाबाजीही केली.मजदूर संघाच्या कार्यालयाकडून सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी येत सोशल डिस्टंसिंग पाळत निदर्शने केली. त्यानंतर श्रमिक गीत गायनाचा कार्यक्रम झाल्यावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . यावेळी पोलीस बंदोबस्तहि ठेवण्यात आला होता .भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष भगवान साटम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनाच्यावेळी उपाध्यक्ष अशोक घाडी , कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर , सचिव हरी चव्हाण , कणकवली तालुका प्रमुख राजेंद्र आरेकर , वैभववाडीचे दिपक गुरव , कुडाळच्या जयश्री मडवळ , हेमंतकुमार परब , देवगडचे सत्यवान कदम , प्रकाश वाडेकर , विकास गुरव , विकास चाळके , अजित सावंत , महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सल्लागार समिती सदस्य अँड. विशाल मोहिते , भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटनमंत्री रवींद्र पुरोहित , सुनीता ताटे , शुभांगी सावंत आदी उपस्थित होते .अशा आहेत मागण्या !कारखाना बंद करणे , कामगार कपात यासाठी शासनाच्या परवानगीची मर्यादा ३०० वरून १०० कामगार करावी , कामगारांसोबतचे निश्चित कालावधीचे वैयक्तिक करार करण्याची मालकांना दिलेली परवानगी रद्द करवी . औद्योगीक स्थाई आदेश लागू होण्याची मर्यादा ३०० ऐवजी ५० कामगार करावी , कामगार संपासाठी १४ दिवसांच्या पुर्वसूचनेच्या मर्यादेत बदल करू नये .

कायम स्वरूपाचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नियमित करण्याची तरदूद केली जावी. सनदी अधिकाऱ्यांना कायद्यातून सूट देण्याचे दिलेले अमर्यादीत अधिकार रद्द करावेत. कामगार संघटनेचे नोंदणी ६० दिवसांत करण्याची कालमर्यादा निश्चित करावी.महिलांना रात्रपाळीच्या कामाला बोलविण्याचा निर्णय रद्द करावा . तसेच वेतन संहिता २०१९ आणि सामाजिक सुरक्षा संहिता २०२० हे दोन्ही कायदे असंघटीत व कागारांच्या हिताचे असल्याने त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी , अशी मागणीहि मजदूर संघाने केली आहे .कामगार संघटनेचे अधिकार नष्ट होणार !केंद्राने लागू केलेल्या संहितेमधील तरतुदीमुळे कामगार संघटनेचे अधिकार काढून घेतले जाणार आहेत . यातून कामगारांची सुरक्षितता नष्ट होईल . तसेच कंत्राटी कामगारांच्या हालाखीत वाढ होईल , असे मत यावेळी अँड. विशाल मोहिते यांनी व्यक्त केले .

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली