शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
2
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
3
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
4
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
5
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
6
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
7
TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
8
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
9
हत्येनंतर मृतदेह पाण्यानं स्वच्छ धुतला अन् त्यानंतर...; थरकाप उडवणारी घटना समोर, नरभक्षकाला अटक
10
अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
11
अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
12
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
13
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
14
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
15
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
17
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
18
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
19
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
20
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg-Local Body Election:..तर केसरकरांचे नाव वापरून मते का मागता, निलेश राणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:53 IST

म्हणूनच आता पैशाने सर्वांना विकत घेण्याची भाषा, सावंतवाडीतील जनता सुज्ञ 

सावंतवाडी : नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुती व्हावी यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आमदार दीपक केसरकर आग्रही होते. परंतु दुर्दैवाने युती झाली नाही. मात्र आता मते मिळवण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केला जात आहे. सावंतवाडीतील जनता हे ओळखून आहे म्हणूनच आता पैशाने सर्वांना विकत घेण्याची भाषा केली आहे. सावध रहा असे आवाहन कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी केले.जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीत आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, संपर्क प्रमुख राजेश मोरे, आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता कविटकर, अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, केसरकर यांना फक्त गरजेपुरते वापरले जात आहे. आज केसरकर व राणे यांची नाव सांगून मते मागली जात आहेत. परंतु हे सर्व चुकीचे आहे. महायुती व्हावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु दुदैवाने ती झाली नाही. २१ तारखेला फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु सकारात्मक कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे अखेर युती तुटली...तर आम्ही स्वतः बंदोबस्त करूमालवण येथे घडलेल्या प्रकाराबाबत ते म्हणाले, या ठिकाणी पैसे वाटून जर कोणी निवडणुका लढवत असतील तर ते चुकीचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवींद्र चव्हाण आल्यानंतर त्या ठिकाणी ते काहीतरी घेऊन आले, असा मला संशय वाटला होता. त्यामुळे आम्ही त्यावर पाळत ठेवली आणि केनवडेकर नावाच्या भाजपा अधिकाऱ्यांच्या घरात वीस ते पंचवीस लाखांची रोकड सापडली आहे. असा प्रकार पुन्हा होणार नाही यासाठी आम्ही स्वतः जातीनिशी लक्ष घालणार आहोत. पोलिसांनी त्यावर आवर न घातल्यास आम्ही स्वतः बंदोबस्त करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.केसरकरांनी निलेश राणेंचे केलं कौतुक आमदार निलेश राणे यांचे दीपक केसरकर यांनी कौतुक केले. राणे करत असलेले काम हे पक्षाच्या हिताचे असून पक्ष वाढीसाठी ते जोरदार मेहनत घेत आहेत. त्यामुळेच युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असल्याचे केसरकर यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rane questions use of Kesarkar's name in Sindhudurg local elections.

Web Summary : Nilesh Rane criticizes using Deepak Kesarkar's name for votes after alliance failure. He alleges money distribution in elections, threatening intervention if police fail. Kesarkar praised Rane's work ethic.