शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

भूमिगत वीज वाहिन्यांबाबत नाईकांनी काय केले ? रेल्वे स्टेशन उद्यान कधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 7:50 PM

आम्ही सत्तेत आल्यावर गेल्या दीड वर्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ ते ५ वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये योजना राबविण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापूर्वी पुढील काळात नगरपंचायतची नुकसानी होऊ नये म्हणून हमीपत्राची मागणी केली होती. त्याची पुर्तता अद्यापही महावितरणने केली नसल्याने हा निधी मागे गेला आहे़. मात्र , या

ठळक मुद्देबंडू हर्णे यांचा प्रति प्रश्न ;

कणकवली : कणकवली शहरासाठी सन २०१५-१६मध्ये भूमिगत वीज वाहिनी मंजूर झाली. त्यावेळी नगरसेवक सुशांत नाईक आणि त्यांचे सहकारी सत्तेत होते.  या सत्ता काळात जनतेबाबत खूप आस्था असल्याचे दाखविणाऱ्या नाईक यांनी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी महावितरणला नाहरकत प्रमाणपत्र का दिले नाही ?  असा प्रतिप्रश्न नगरसेवक बंडू हर्णे यांनी  विचारला आहे.

              तसेच ही योजना राबविताना रस्त्याची  खोदाई करून भुमीगत वीज वाहिनी टाकण्यात   येणार  होती. भविष्यात शहरातील रस्ता रुंदीकरण करताना त्याची अडचण होईल. त्यामुळे या वाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी  त्यावेळी होणारा खर्च महावितरणने करावा व तसे हमीपत्र आता द्यावे . अशी मागणी केल्यानंतर महावितरणने ते दिले नाही. त्यामुळे नाहरकत देण्यात आलेली नाही.  मात्र , त्या निधीतून   सुशांत नाईक यांनी महाडीक कंपाऊंड जवळ ट्रान्सफार्मर बसवून स्वत:चा पाच लाखांचा फायदा करून घेतला आहे. असा आरोपही बंडू हर्णे यांनी यावेळी केला.

            कणकवली नगरपंचायत कार्यालयातील  नगराध्यक्ष  दालनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. विराज भोसले, माजी बांधकाम सभापती अभिजित मुसळे, अजय गांगण , किशोर राणे, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.

        बंडू हर्णे म्हणाले,  सुशांत नाईक हे स्वतः  खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याचे समजतात. मात्र, त्यांनी कणकवली शहरातील रेल्वेस्टेशन जवळील उद्यान  व नगरपंचायतला नवीन ट्रॉलीसह ट्रॅक्टर देण्यासाठी ११ आॅगस्ट २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत ठराव घेतला होता.त्याला  तीन वर्षे होऊन गेली . मात्र, त्याबाबत सुशांत नाईक यांनी किती पाठपुरावा केला. या भूमिगत विजवाहिनीच्या कामासाठी खासदारांनी निधी आणला, असे सांगणाºया सुशांत नाईक यांनी आपण  सत्तेत असताना पाठपुरावा करून हे काम मार्गी लावण्याची गरज होती. पण तसे झाले नाही. हे त्यांचे अपयश आहे. 

          आम्ही सत्तेत आल्यावर गेल्या दीड वर्षात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत ४ ते ५ वेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये योजना राबविण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापूर्वी पुढील काळात नगरपंचायतची नुकसानी होऊ नये म्हणून हमीपत्राची मागणी केली होती. त्याची पुर्तता अद्यापही महावितरणने केली नसल्याने हा निधी मागे गेला आहे़. मात्र , या योजनेतून कणकवली शहरात १२ ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत.

          सुशांत नाईक ज्यांच्या संगतीला लागले आहेत त्यांनी शहरामध्ये आतापर्यंत फक्त वाद लावण्याचे काम केले आहे. जे लोक मागच्या दाराने नगरपंचायतमध्ये आले आहेत त्यांच्या सांगण्यावरून सुशांत नाईक चुकीच्या पध्दतीने प्रसिद्धी माध्यमाना माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी दुसºयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

          ज्या सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता चार वर्षे होती़ .त्या ठिकाणचा भूमिगत वीज वाहिन्यांचा  निधी सुद्धा   त्या वेळच्या पालकमंत्री आणि विनायक राऊत यांच्या आपापसातील वादामुळे परत गेला आहे. यापूर्वी त्या दोघांमध्ये वाद असल्याचे आम्ही  फक्त ऐकून होतो. मात्र,   आमच्यावर टिका करून नाईक यांनी ते अधोरेखित केले आहे. त्यामुळे आमच्यावर व आमदार नितेश राणेंवर टीका करण्यापूर्वी नाईक यांनी आधी त्याचा विचार करावा. निधी आला पण सुशांत नाईक यांना त्यांच्या सत्ता काळात पाठपुरावा करता आला नसल्याने तो निधी खर्च होऊ शकलेला नाही.

              मालवण  येथे  भूमिगत विजवाहिन्यांचे काम सुरू असून तिथे स्क्वेअर रनिंग मिटरचा दर १४३५ रूपये असताना तो ९२५ रुपये असल्याचे सांगून खोटी आकडेवारी नाईकांनी दिली आहे. या कामासाठी आमचा दर २३०० रूपये व सावंतवाडीचा २५०० रूपये होता. याची माहिती नाईक यांनी आधी घ्यावी आणि  नंतरच वक्तव्य करावे.

          या दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा . आम्हाला तो मान्य असेल. असे आम्ही सांगूनही महावितरणने त्याबाबत काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे हा निधी मागे गेला आहे. तरीही भूमिगत वीज वाहिन्यांसाठी पुन्हा निधी मिळावा  यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न राहतील, असा विश्वास बंडू हर्णे यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग