शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
4
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
5
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
6
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
7
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
8
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
9
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
10
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
11
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
12
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
13
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
14
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
15
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
16
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
17
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
18
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
19
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: हत्तीपकड मोहिमेबाबत लवकरच तोडगा काढू, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:38 IST

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबविण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन ...

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबविण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी दिल्याने अखेर तालुक्यातील सरपंचानी सुरू केलेले उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले.तिलारी खोऱ्यात हत्तींचा वाढता वावर पाहता ग्रामस्थांसह शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. येथे वावरत असणाऱ्या हत्तींच्या कळपात लहान पिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरीवर्गात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.हत्तींच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी काजू बागायतीकडे पाठ फिरवल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वर्षभर मेहनत घेतलेले काजू पीक ऐन हंगामात हत्तींमुळे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे या परिसरात हत्तीपकड मोहीम राबवा, अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारपासून येथील वनविभाग कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती.शेतकऱ्यांचा रोषप्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामानुजन यांनी उपोषणस्थळी भेट दिली असता त्यांच्यावर उपोषणकर्त्यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी एन. रामानुजन म्हणाले की, कर्नाटकातून हत्तीपकड मोहिमेतील तज्ज्ञ टीम या भागात आणण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून परवानग्या मिळताच ही मोहीम राबविणे शक्य होईल, असे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले.पालकमंत्र्यांकडून आश्वासनसरकार शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक आहे. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे व माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने रात्री उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीforest departmentवनविभागguardian ministerपालक मंत्रीNitesh Raneनीतेश राणे