व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 05:53 PM2020-02-01T17:53:50+5:302020-02-01T17:54:56+5:30

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सध्या व्यापाºयांच्या अनेक समस्या असून व्यापाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी महासंघाच्यावतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन व्यापा-यांची मागणी असलेली सनदीबाबत चर्चा करण्यात आली होती.

We will meet the demands of the merchants | व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन

व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन

Next
ठळक मुद्देसकारात्मक चर्चा यावेळी झाली असली तरीही या मागण्या मान्य होण्यासाठी आपल्याला सतत कार्यरत राहिले पाहिजे.

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने व्यापाºयांच्या मागण्यांबाबत सनदी संदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत विशेष बैठक आयोजित करून व्यापाºयांच्या मागण्या व त्यांची स्वप्ने मुख्यमंत्री ठाकरे व आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता अर्थात संघर्ष मेळाव्यात बोलताना व्यापाºयांना दिले. तसेच व्यापा-यांची ताकद ही मोठी ताकद आहे. मात्र या त्यांच्या एकजुटीच्या ताकदीवर कोणाचा झेंडा येऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व कुडाळ तालुका व्यापारी संघटना आयोजित व्यापारी एकता अर्थात संघर्ष मेळाव्याच्या दुसºया सत्राच्या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा, कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, स्वागताध्यक्ष व कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय भोगटे, सुनील सौदागर, संघाचे कार्यवाह नीलेश धडाम, कोषाध्यक्ष प्रसाद धडाम, उपाध्यक्ष प्रकाश वाळके, सुमंगल कालेकर, संजय सावंत, संदेश पडते, अवधूत शिरसाट, दीपक भोगले, नितीन वाळके, अनिल सौदागर, द्वारकानाथ घुर्ये, विद्याप्रसाद बांदेकर तसेच व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सध्या व्यापाºयांच्या अनेक समस्या असून व्यापाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी महासंघाच्यावतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन व्यापा-यांची मागणी असलेली सनदीबाबत चर्चा करण्यात आली होती. आता लवकर या सनदीतील मागण्या पूर्ण होण्यासाठी व्यापाºयांची विशेष बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन व्यापाºयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच त्यांनी बोलताना सांगितले की विधानपरिषदेत व्यापा-यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यापाºयांचा प्रतिनिधी असावा अशी मागणी संबंधित आहे. सदरची ही मागणी भविष्यात पूर्ण होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. मात्र, तोपर्यंत तुमचा प्रतिनिधी आमदार म्हणून मी विधानसभेत सदैव कार्यरत असणार असल्याचा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

९जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी सांगितले की, व्यापाºयांच्या सनदीमध्ये विविध मागण्या मांडल्या असून या मागण्या शासन स्तरावर मागणी मान्य होण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सकारात्मक चर्चा यावेळी झाली असली तरीही या मागण्या मान्य होण्यासाठी आपल्याला सतत कार्यरत राहिले पाहिजे. भविष्यात अनेक समस्या, प्रश्न, निर्माण होणार आहेत. ते सोडविण्यासाठी आपली एकजूट ही अशीच ठेवली पाहिजे. असे सांगत त्यांनी एखाद्या शहरात मॉलला परवानगी देण्याअगोदर शासनाने त्या मॉलला लोकसंख्येची जी अट आहे ती पाहूनच परवानगी द्यावी असे त्यांनी सांगितले.

चौकट

पालकमंत्र्यांचा गौरव

यावेळी व्यापारी महासंघाच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार कुडाळ येथील अवधूत शिरसाठ यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पालकमंत्री उदय सामंत, सुनील सौदागर यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

सिंधुफोटो ०१

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत यांचा गौरव संंतोष मंडलेचा यांनी केला. यावेळी  नितीन तायशेटे, संजय पडते, शंकर कोरे, संदेश पारकर, ओंकार तेली, संजय भोगटे, सुनील सौदागर, विद्याप्रसाद बांदेकर उपस्थित होते.

Web Title: We will meet the demands of the merchants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.