शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापनाची गरज

By admin | Updated: November 3, 2014 23:24 IST

सावंतवाडीत रोगराईची भीती : डेपोतील कचरा रस्त्यावर

सावंतवाडी : येथील लाडाची बाग परिसरातील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढले असून सर्व कचरा आणि घाण रस्त्यावर येऊ लागली आहे. त्यामुळे जवळपासच्या वाड्यातील घरांमध्ये रोगराई व साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या कचऱ्याच्या साठ्यामुळे डासांची पैदास होऊन तापसरीची लागण या परिसरात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या कचरा व्यवस्थापनासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बेळगाव-सावंतवाडी या मार्गावर हा कचरा डेपो आहे. बरेच पर्यटक पर्यटनासाठी सावंतवाडी तालुक्यात येतात. यावेळी त्यांना परिसरातील कचरा आणि घाणीचा त्रास सहन करावा लागतो. पूर्ण प्रवास संपेपर्यंत हा वास नाकामधून जात नसल्याची तक्रार वाहनचालकांची आहे. या कचरा डेपोच्या दरवाज्यावर आणि बाहेरही कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. हा कचरा वाऱ्यामुळे तसेच अन्य कारणांनी मुख्य रस्यावर येतो. त्यामुळे या भागातून प्रवास करणारी वाहने अथवा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. संपूर्ण सावंतवाडीतील कचरा या कचरा डेपोमध्ये आणून टाकला जातो. त्यामुळे डेपोत कचऱ्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामुळे कचरा कुजतो. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्या रुतण्याच्या भीतीने डेपोमध्ये घातल्या जात नाहीत. परिणामी कचरा डेपोच्या दरवाज्यावरच फेकला जातो. यामुळे डेपोच्या दरवाज्यावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. हा कचरा जेसीबी सारख्या यंत्रानेच बाजूला करणे योग्य ठरेल. यासाठी संबंधित विभागाने त्वरीत योग्य ती कार्यवाही करून संभाव्य धोके टाळण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे. साथरोगांचा प्रादुर्भाव शक्यकचरा डेपोतील अस्ताव्यस्त पडलेला आणि मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तसेच ओढ्यातून नदीला मिळणारे सांडपाणी यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. काहीगावांमध्ये साथरोगाचे रूग्ण सापडले आहेत. काही रुग्ण दगावल्याचीही उदाहरणे आहेत. नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)शेतीला सांडपाण्यापासून धोकाया कचरा डेपोलगत असलेल्या ओढ्यामध्ये सावंतवाडीतील सांडपाणी सोडले जाते. या ओढ्याचे पाणी नदीपात्राला जाऊन मिळते. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या कारिवडे, माडखोल आदी गावातील शेतीला या सांडपाण्यापासून धोका पोहोचू शकतो. शेतकऱ्यांच्या जनावरांनाही पिण्यासाठी या नदीतील पाणी दिले जाते. त्यामुळे शहरातील सांडपाणी नदीत न सोडता अन्य ठिकाणची त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.