Warning to Tilari riverside villages | तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठळक मुद्देतिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारानदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता

सिंधुदुर्ग : तिलारी धरणाच्या परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे खरारी नाल्यातील पाणी नदी पात्रात येऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणाच्या साठ्याच वेगाने वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रीत ठेवण्याच्या दृष्टीने धरणात येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तसेच धरणाच्या परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे खरारी नाल्यातील पाणी नदी पात्रात येऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आजपासून पुढील कालावधीत नदी पात्रातून येजा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी. नदी काठच्या सर्वच गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन सहाय्यक अभियंता, तिलारी शिर्षकामे उपविभाग, कोनाळकट्टा यांनी केले आहे.

Web Title: Warning to Tilari riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.