उलटी होऊन ताप अन् अशक्तपणा आला, कुडाळमधील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 11, 2023 16:53 IST2023-08-11T16:52:23+5:302023-08-11T16:53:17+5:30
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : देवगड तालुक्यातील जामसंडे श्रीकृष्णनगर येथील रहिवासी व सध्या कुडाळ माठेवाडा येथे राहणाऱ्या ध्रुव मुकेश ...

उलटी होऊन ताप अन् अशक्तपणा आला, कुडाळमधील शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला
कुडाळ (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यातील जामसंडे श्रीकृष्णनगर येथील रहिवासी व सध्या कुडाळ माठेवाडा येथे राहणाऱ्या ध्रुव मुकेश आंबेरकर (वय-११) या विद्यार्थ्याचे बुधवारी (दि.९) उपचारादरम्यान निधन झाले. त्याला उलटी झाल्याने तसेच ताप येऊन अशक्तपणा आल्याने मंगळवारी (दि.८) कुडाळ येथील डॉ. रावराणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्याने त्याला पडवे येथील एसएसपीएम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
ध्रुव येथील कुडाळ हायस्कूलमध्ये सहावीत शिकत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने आंबेरकर कुटुंबाला धक्का बसला असून, जामसंडेनगर गावावर शोककळा पसरली आहे. पडवे येथे निधन झाल्याचे घोषित केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
याबाबत देवगड पोलिस ठाण्यात कळविण्यात आले. मात्र, मृत्यूमागील निश्चित कारण समजू शकलेले नाही. ध्रुवला उलटी झाल्याने अशक्तपणा आल्याने कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. धुव्र याच्यावर जामसंडेत अंत्यसंस्कार करण्यात आले.