शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

साऱ्यांचेच डोळे पाणावले... व्हिडीओ कॉलवरून पत्नीने घेतले पतीचे अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:01 IST

गावापासून पाचशे किमी अंतरावर मुंबईत पतीचे निधन; लॉकडाऊनमुळे पत्नी मुकली अंत्यसंस्काराला

सचिन खुटवळकर/

दोडामार्ग - पत्नी कोकणात गावाकडे आणि पती ५00 किलोमीटर अंतरावर अंधेरी-मुंबई येथे. दुर्दैवाने पतीचा अल्पशा आजाराने मुंबईत मृत्यू झाला आणि गावाकडे असलेल्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला. अंत्यदर्शनासाठी मुंबईत जावे, तर लॉकडाऊनमुळे ते शक्य नव्हते. अखेरीस ग्रामस्थांनी मुंबईत बांदेकर कुटुंबियांशी चर्चा करून व्हिडीओ कॉलवरून त्या महिलेला पतीचे अंत्यदर्शन घडविले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावातील बांदेकर कुटुंबीय मुंबईत राहतात. चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर हे ६७ वर्षीय गृहस्थ पत्नी, दोन मुलगे, दोन सुना व नातवंडांसह तेली गल्ली, अंधेरी पूर्व येथील रहिवासी. मुंबईत राहत असले, तरी निवृत्तीनंतर गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अधूनमधून ते पत्नीसह गावाकडे यायचे. शिमगोत्सवापूर्वी ते गावात आले होते. चैत्र महिन्यात रामनवमी उत्सवासाठी पुन्हा यायचे असल्याने पत्नीला गावाकडे ठेवून ते मुंबईला रवाना झाले. मात्र तत्पूर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले व त्यांना रामनवमीला येता आले नाही. तसेच पत्नीही गावातच अडकून पडली. दरम्यानच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून त्यांचा संवाद सुरू होता. गुरुवारी दुपारी दोन वाजता चंद्रकांत बांदेकर यांचे अल्पशा आजाराने अंधेरी येथे निधन झाल्याची वार्ता गावात थडकली. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचे पार्थिव ना गावाकडे नेणे शक्य होते, ना त्यांच्या पत्नीला मुंबईला जाणे शक्य होते. अशा अवघड स्थितीत पतीच्या अंत्यदर्शनासाठी त्यांची पत्नी टाहो फोडत होती. अखेरीस मुंबईहून त्यांच्या सुनेने काळजावर दगड ठेवून दु:ख बाजूला सारत एका ग्रामस्थाच्या स्मार्टफोनवर व्हिडीओ कॉल केला. पतीच्या पार्थिवाचे दर्शन होताच पत्नीने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. मुंबईत राहायला असूनही चंद्रकांत बांदेकर हे गावातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यात आवर्जून सहभागी होत असत. उत्तम नाट्यकलाकार व दिग्दर्शक म्हणून ते परिचित होते, अशी माहिती सरपंच महादेव गवस यांनी दिली.

नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइन