शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : नितेश राणेंचा पोलीस ठाण्यात गोंधळ, मला अटक केली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 23:20 IST

नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजर केले असता, त्यांनी पोलिसांशी बोलताना गोंधळ घातला. तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्ही मला अटक केली तर कणकवलीकर मरतील, असे म्हणत राणेंनी पोलिसांना अटक न करण्याचे आवाहन केले. 

नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर राणेंसह त्यांच्या कार्यर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच, तुम्हाल जे करायचंय ते करा, पण मला अटक केल्यास ते जिंकतील, असे म्हणत शिवसेना नेत्यांकडे इशारा केला.

आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते आहे. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या, असे म्हणत शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या कार्यकर्त्यानी ओतल्या. कणकवलीनगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे विचारत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदीपुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते. कणकवली शहरातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथून आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र  गायकवाड, संजय कामतेकर, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, शहराध्यक्ष राकेश राणे, नगरसेवक अभिजित मुसळे, संदीप नलावडे, युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, गटनेते संजय कामतेकर, विठ्ठल देसाई, सभापती सुजाता हळदिवे, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, पंचायत समिती  सदस्य मिलींद मेस्त्री, निखील आचरेकर, सचिन पारधीये, किशोर राणे आदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी सुरू केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे KankavliकणकवलीPoliceपोलिसMLAआमदार