वेंगुर्लेत अनधिकृत मिनी पर्ससीनवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:11 IST2017-09-07T17:06:38+5:302017-09-07T17:11:01+5:30
वेंगुर्ले-उभादांडा येथे ५ वाव खोल समुद्रात अनधिकृतपणे विनापरवाना मिनी पर्ससीन मासेमारी करणाºया बोटमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली.

वेंगुर्लेत अनधिकृत मिनी पर्ससीनवर गुन्हा दाखल
मालवण : वेंगुर्ले-उभादांडा येथे ५ वाव खोल समुद्रात अनधिकृतपणे विनापरवाना मिनी पर्ससीन मासेमारी करणाºया बोटमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली.
वेंगुर्ले-उभादांडा येथील समुद्रात बोट मालक कामील जुजे फर्नांडिस ( रा. दाभोसवाडी-वेंगुर्ला) याच्या बोटीत ६०० किलो लेप जातीची मासळी सापडली. बोट मालक कामील जुजे फर्नांडिस याच्या विरोधात अनधिकृत मिनी पर्ससीन मासेमारी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वेंगुर्ला तहसीलदारांकडे कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
पारंपारिक मच्छिमारांच्या नुकसानीचा अहवाल प्रादेशिक उपायुक्तांकडे
दरम्यान, परप्रांतीय बोटींनी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर बुधवारी केलेल्या घुसखोरीदरम्यान पारंपरिक मच्छिमारांची जाळी तुटुन नुकसान झाले होते. त्या नुकसानीचा अहवालही प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी माहिती दिली.