शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रमांची रेलचेल

By admin | Updated: September 30, 2015 00:04 IST

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवस चालणाऱ्या संस्थांनी थाटाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन

आचरा : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवस चालणाऱ्या संस्थांनी थाटाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आचरे दशक्रोशीमधील सर्व आबालवृद्धांना यानिमित्त अनोख्या पर्वणीचा आनंद लुटता येणार आहे.या गणेशोत्सवामध्ये गुरुवार १ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन आचरा दशक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आले आहे. तर रात्री १० वाजता चामुंडेश्वरी फुगडी संघ कविलकाटे (कुडाळ) यांच्या बहारदार फुगडीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार ३ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता गणेश दशावतार नाट्यमंडळ कडावल (कुडाळ) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार १२ आॅक्टोबर रोजी १० वाजता गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवार १४ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता आमची शाळा आमचे गुणदर्शन हा पहिली ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थीवर्गाचा सहभाग असलेला कार्यक्रम होणार आहे.शनिवार १७ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १९ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता देवगड येथील आर्ट सर्कल प्रस्तुत तीन अंकी संगीत नाटक गोरा कुंभार सादर होणार आहे. शुक्रवार २३ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता खुली वन नाईट आमने सामने डबलबारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार २४ आॅक्टोबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मुंंबई येथील भजनी बुवा दुर्वास गुरव विरुद्ध पोखरण येथील भजनी बुवा समीर कदम यांच्यामध्ये डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. मंगळवार २७ आॅक्टोबर रोजी आचरावासियांची महाआरती होणार असून बुधवार २८ आॅक्टोबर रोजी ‘श्रीं’च्या गणेशमूर्तीचे विसर्जन भव्य मिरवणुकीने आचरा पिरावाडी येथील समुद्रकिनारी होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे अध्यक्ष संतोष मिराशी व कार्याध्यक्ष कपिल गुरव यांनी केले आहे. (वार्ताहर)नाविन्यपूर्ण अभंग स्पर्धासोमवार ५ आॅक्टोबर रोजी ‘सार सांगूनी गा रे अभंग’ ही नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे. बुधवार ७ आॅक्टोबर रोजी वाई येथील किर्तनकार शरद घाग यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार १० आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता बालगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी यांचा ‘श्रावण मासी हर्ष मानसी भाद्रपदी नमू गणरायसी’ हा बहारदार संस्कृती दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.