सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदी नितेश राणेंची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:25 IST2022-02-18T17:24:57+5:302022-02-18T17:25:27+5:30
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदी नितेश राणेंची बिनविरोध निवड
सिंधुदुर्ग : जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर दुसरे सदस्य म्हणून प्रकाश मोर्ये यांना संधी देण्यात आली आहे. आज ही निवड प्रकीया झाली.
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गजानन गावडे, महेश सारंग, बाबा परब, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण नीता राणे, व्हीकटर डाट्स, समीर सावंत, रवी मंडगावकर, सुशांत नाईक, आत्माराम ओटवणेकर, विध्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी आदी संचालक या बैठकीस उपस्थित होते.
निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले.