शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

साटेली गाव मायनिंगच्या दहशतीखाली

By admin | Updated: November 19, 2014 23:13 IST

ट्रक मालक संघटनेचा आरोप : सावंतवाडीतील ठेकेदार, अधिकाऱ्यांची बैठक

सावंतवाडी : ओरोस येथे साटेली ट्रकमालक संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषणानंतर आमदार दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करत येथील प्रांताधिकारी कार्यालयात संघटनेच्या प्रतिनिधींची तसेच मायनिंग कंपनीच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक पार पडली. यावेळी ट्रकमालक संघटनेने साटेली गावात मायनिंगमाफियांची दहशत असून विरोधात बोलल्यास आमच्या अंगावर गाड्या घालतात, असे आरोप प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, आमदार दीपक केसरकर व नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांच्यासमोर केली. मात्र, मायनिंग कंपनी व ठेकेदारांच्यावतीने हे आरोप फेटाळण्यात आले असून संघटनेच्या काही मागण्या मान्यही केल्या. चार दिवसांपूर्वी साटेलीतील ट्रक मालक संघटनेच्यावतीने ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी संघटनेने अठरा मागण्या ठेवल्या होत्या. यात प्रामुख्याने साटेली गावातीलच डंपर मायनिंगसाठी वापरणे, साटेलीची ट्रक मालक संघटनाच असावी, मागील रक्कम मिळावी, गावच्या युवकांना कंपनीत सामावून घेण्यात यावे, मायनिंगच्या पैशातून मंदिर तसेच विकासकामे करण्यात यावीत, अशा मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. या मागण्यांबाबत आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रांताधिकाऱ्यांसमोर उपोषणावर यशस्वी तोडगा काढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे बुधवारी संघटनेच्यावतीने अध्यक्ष प्रशांत साटेलकर, विठ्ठल जाधव, मीनल साटेलकर, सहदेव कोरगावकर, संतोष जाधव, सरपंच रंजना नाईक आदी सहभागी झाले होते. तर कंपनीच्यावतीने मनोज ठाकूर, शेखर गावकर तसेच ठेकेदार म्हणून दत्ता कवठणकर, बाप्पा कवठणकर आदी उपस्थित होते. या बैठकीत मायनिंगच्या नवीन दराबाबत येत्या चार-पाच दिवसात तोडगा काढून तसेच उर्वरित मागण्यांपैकी गावातील विकासकामे मायनिंगच्या पैशातून केली जातील, मागील राहिलेली देणी तातडीने दिली जातील, साटेली गावातील कामगारांना कंपनीत सामावून घेतले जाईल, ट्रक मालक संघटनेच्या निर्णयानंतरच बाहेरील गाड्या घेतल्या जातील, या मागण्या त्वरित मान्य करण्यात आल्या. मात्र, संघटनेच्यावतीने विठ्ठल जाधव यांनी आपल्या अंगावर तीन वेळा गाडी घालण्यात आली. कंपनीच्या विरोधात बोलले की धमक्या येतात, तसेच गाव पूर्ण दहशतीखाली आहे, असे आरोप केले. तर मायनिंग कंपनीच्यावतीने हे आरोप फेटाळून लावत आम्ही दहशत करत नाही, पुरावे द्या, असे सांगितले. प्रांताधिकारी इनामदार यांनी समंजसपणे तोडगा काढत गावात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घेऊ, तसेच संघटनेच्या मागण्यांबाबत २५ नोव्हेंबरला पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आमदार केसरकर यांनी शांतता राखावी, कायदा हातात घेऊ नये, अशी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयात मायनिंगबाबतच्या बैठकीत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार व आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.