उंबर्डेतील हाणामारीत महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:28 IST2019-08-20T14:27:12+5:302019-08-20T14:28:55+5:30
उंबर्डे मेहेबूबनगर येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत तक्रारदाराची पत्नी रमीझान बोबडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. अटक केलेल्यांमध्ये मुराद मोहम्मद पाटणकर, असऱ्या मोहम्मद पाटणकर, अलमुद्दीन रमजान नाचरे, अमिर हुसेन बोबडे यांचा समावेश आहे.

उंबर्डेतील हाणामारीत महिला गंभीर जखमी
वैभववाडी : उंबर्डे मेहेबूबनगर येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत तक्रारदाराची पत्नी रमीझान बोबडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. अटक केलेल्यांमध्ये मुराद मोहम्मद पाटणकर, असऱ्या मोहम्मद पाटणकर, अलमुद्दीन रमजान नाचरे, अमिर हुसेन बोबडे यांचा समावेश आहे.
उंबर्डे मेहबूबनगर येथील रमजान इब्राहीम बोबडे (४५) हे आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी चौघे त्यांच्या घरानजीक रस्त्यावर बसले होते. बोबडे यांनी त्यांना रस्त्यावर का बसलात? आपापल्या घरी जा, असे सांगितले. त्यावेळी रस्त्यावर बसलेल्या चौघांनी तू आम्हांला सांगणारा कोण? असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
बोबडे यांना चौघांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. हाणामारीचा आवाज आल्यामुळे रमीझानही तेथे गेली. तिने पतीला चौघांच्या तावडीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मुराद बोबडे याने लोखंडी सळीने बोबडे यांच्यावर केलेला वार रमीझान यांच्यावर बसला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.